
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने अकराव्या पीवायसी- पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, रावेतकर बुल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी मैदानावर रविवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रणजीत पांडे (४६ धावा), रौनक ढोले पाटील (नाबाद ३७) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर गरगंटू डिस्ट्रॉयर्स संघाने नॉक ९९ पुणेरी बाप्पा संघाचा ९ धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
दुसऱ्या लढतीत प्रसाद जाधव (नाबाद ७०) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रावेतकर बुल्स संघाने पायरेट्स संघाचा २२ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखाना अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे सहसचिव सारंग लागू आणि पुसाळकर सुरक्षा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहन पुसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जुई पुसाळकर, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्रिकेट विभागाचे सचिव अविनाश रानडे, होडेक वायब्रेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे अभिजीत खानविलकर व विजय कुमार, बेलवलकर हाऊसिंग लिमिटेडचे समीर बेलवलकर, रांजेकर रियालिटीचे अनिरुद्ध रांजेकर, चाफळकर करंदीकर डेव्हलपर्सचे श्रीनिवास चाफळकर, सुजनीलचे आशिष देसाई, सुप्रिम इन्फ्राचे आमिर आजगावकर, आशुतोष देशपांडे, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, तन्मय आगाशे, सिद्धार्थ दाते, शिरीष साठे, विनायक द्रविड आदी मान्यवर उपस्थित होते.