
छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय सागरी जलतरण स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील एमपीपी क्लबच्या नऊ खेळाडूंनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
ही स्पर्धा पोरबंदर येथील श्री राम स्विमिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून १५०० जलतरणपटू सहभागी झाले होते. ही स्पर्धा विविध वयोगटात घेण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सई गाडेकर, संस्कृती सुरडकर, साई गाडेकर, शिवानंद कुलकर्णी, अर्णव जाधव, राम गाडेकर, दिगंबर घुघासे, हरिष सांगते, सागर बडवे यांनी यशस्वीरित्या पूर्ण करुन पदकांची कमाई केली. सागर बडवे याने पाच व दहा किलोमीटर अंतर स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले.
या सर्व खेळाडूंना सागर बडवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या घवघवीत यशाबद्दल एमपीपीचे गोपाल पांडे, विनायक पांडे, संकर्षण जोशी, मकरंद जोशी आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.