
जळगाव : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या १६ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना विफातर्फे प्रमाणपत्र जिल्हा संघटनेस प्राप्त झाले. या प्रमाणपत्रामुळे दहावी व बारावीच्या परीक्षेत क्रीडा गुण मिळतात. या प्रमाणपत्राचे वितरण जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या विविध मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख, मध्य रेल्वे भुसावळचे राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक नितीन डेविड, मोइस चार्ल्स, थॉमस डिसोजा, उज्ज्वल काळे, गायकवाड, अमीन शेख यांच्यासह संघटनेचे कार्याध्यक्ष अनिता कोल्हे, संघटनेच्या सीईओ हिमाली बोरोले, मुख्य प्रशिक्षक राहील अहमद व प्रकल्प प्रमुख वसीम शेख उपस्थित होते.