
टीआरएस फाऊंडेशनतर्फे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : टीआरएस फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंडर १५ व अंडर ११ बुद्धिबळ स्पर्धेत अर्णव तोतला आणि श्रेयस नलावडे यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत आर्यन सोनवणे व भक्ती गवळी यांनी उपविजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नभा कदम, हर्षिता गंगन, आर्या अदवंत, देवांश्री गावंडे, हिमांशु अग्रवाल, सान्वी ढोले, अनय आंबोरे, तनिष्का देशमुख, नित्या परिटकर, अदिराज देशमुख, अभिराज देशमुख, अनुष्का हातोळे, युवराज पाटील, सम्यक रामटेके, आवश्य नाथ, समृद्धी काळे, अंश गायकवाड, विहांग गंगन, सम्यक गायकवाड, पलाशा गायकवाड, अंश मिटकर, शौर्य पागोरे, विशुद्धी कांबळे, राज गिरबडे, आदर्श जाधव या खेळाडूंना पदक देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू स्वरा लढ्ढा हिचा डॉ मंगेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अजय पटेल, विलास राजपूत, वुमन्स इंटरनॅशनल मास्टर तेजस्विनी सागर, सोनाली लढ्ढा, प्रायोजक सुदाम झोटिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
अंतिम निकाल
अंडर १५ गट : १. अर्णव तोतला, २. आर्यन सोनवणे, ३. काव्या वाघचौरे, ४. समृद्धी कांबळे.
अंडर ११ गट : १. श्रेयस नलावडे, २. भक्ती गवळी, ३. स्वरा लढ्ढा, ४. श्रेयांश तोतला.