
सात देशांचे संघ घोषित
दुबई ः चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी आठ पैकी सात देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. बीसीसीआयने अद्याप भारतीय संघ घोषित केलेला नाही.
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. यासाठी आतापर्यंत सात देशांच्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. फक्त भारताने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. या स्पर्धेसाठी इंग्लंडने सर्वप्रथम संघ जाहीर केला. त्यानंतर बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने आपले संघ जाहीर केले आहेत.
ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील सामने पाकिस्तान आणि युएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जाहीर झालेले संघ
पाकिस्तान : मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आझम, सईम अयुब, तय्यब ताहिर, इरफान खान नियाझी, सुफियान मुकीम, मोहम्मद हसनैन, अब्दुल्ला शफीक, नसीम शाह, उस्मान खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अब्रार अहमद, कामरान गुलाम, सलमान अली आघा, इमाम-उल-हक, फखर जमान, हसीबुल्लाह आणि अब्बास आफ्रिदी.
बांगलादेश : नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदय, मुशफिकुर रहीम, एमडी महमुदुल्लाह, झाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन. साकिब, नाहिद राणा
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.
अफगाणिस्तान : हश्मतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरान, रहमान उल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, एएम गझनफर, नूर अहमद, फजल हक फारुकी, फरीद मलिक, नवीद झदरान
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, अॅडम झाम्पा.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, अँरिक नोर्खिया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डेर ड्यूसेन.