
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड दिनेश वकील यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : ‘खेळाडूंनी मोबाईल, टीव्हीपेक्षा मैदानात रमावे. फास्ट फूड पासून लांब राहून खेळात आघाडीवर राहावे. मैदानावरील जय-पराजय खिलाडूवृत्तीने स्वीकारावेत असे प्रतिपादन सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड दिनेश वकील यांनी केले.
हैदराबाद मुक्ती संग्राम क्रीडा महोत्सवाचे आयोजन सरस्वती भुवन शिक्षण संस्था व ॲडव्होकेट कल्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड दिनेश वकील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ॲड संकर्षण जोशी, ॲड बाळासाहेब वाघमारे, डॉ दयानंद कांबळे, डॉ विशाल देशपांडे, चंद्रशेखर पाटील, डॉ पूनम राठोड, सतीश पाठक, संजय कंटूले, उदय पंड्या, दीपक सपकाळ, अनुराधा मिरजकर व गिर्यारोहक सूरज सुलाने आदी उपस्थित होते.
ॲड संकर्षण जोशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळ आणि आरोग्य याचे महत्त्व पटवून दिले. तसेच सरस्वती भुवन शिक्षण संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व क्रीडा स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते असेही नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ विशाल देशपांडे यांनी केले. या क्रीडा महोत्सवात डॉ दयानंद कांबळे, दीपक सपकाळ, उदय पंड्या, सतीश पाठक, प्रफुल्ल कुलकर्णी, अरविंद दानवे, वैष्णवी शिरसाट आदींनी पंच म्हणून काम पाहिले.
क्रीडा महोत्सवाचा अंतिम निकाल
खो-खो चौदा वयोगट मुली : १. माँटेसरी बालक मंदिर, २. ए के वाघमारे प्रशाला. खो-खो चौदा वयोगट मुले : १. ए के वाघमारे प्रशाला, २. शासकीय विद्या निकेतन. खो-खो सतरा वयोगट मुली : १. ए के वाघमारे प्रशाला, २. शारदा मंदिर कन्या प्रशाला. खो-खो सतरा वयोगट मुले : १. सरस्वती भुवन प्रशाला, २. शासकीय विद्या निकेतन.
बॅडमिंटन मुली : १. अनन्या अंभोरे, २. मधुरा लोळगे. मुले : १. राजवीर देसाई, २. अजिंक्य हिशोबे.
अॅथलेटिक्स स्पर्धेचा निकाल
गोळाफेक १४ वर्षांखालील मुली : १. दिशा चव्हाण, २. श्रुती त्रिभुवन, ३. राजेश्वरी जाधव. गोळाफेक १७ वर्षांखालील मुली : १. रश्मी पारधी, २. वैष्णव भावले, ३. दीप्ती वानखेडे. गोळाफेक १४ वर्षांखालील मुले : १. गौरव माळी, २. श्रेयस बर्डे, ३. चैतन्य लोखंडे. गोळाफेक १७ वर्षांखालील मुले : १. मोईन सय्यद, २. धर्मदीप मगरे, ३. हर्षवर्धन भराडे.
२०० मीटर धावणे : १४ वर्षांखालील मुली : १. अंकिता सोनवणे, २. श्रेया रगडे, ३. कांचन घोडेले. १७ वर्षांखालील मुली : १. वैष्णवी भावले, २. दुर्वा राजपूत, ३. वैष्णवी पाटसवाणे. १४ वर्षांखालील मुले : १. श्रेयस झुंबड, २. सोपान दौड, ३. श्रेयस बर्डे. १७ वर्षांखालील मुले : १. हर्ष पाटील, २. धम्मदीप मगरे, ३. अमर वाघमारे.
४०० मीटर धावणे : १४ वर्षांखालील मुली : १. दिशा इंगळे, २. ॠतुजा पाडसवान, ३. प्रणाली पवार. १४ वर्षांखालील मुली : १. दिशा इंगळे, २. ॠतुजा पाडसवान, ३. प्रणाली पवार. १७ वर्षांखालील मुली : १. आकांक्षा क्षीरसागर, २. दिव्या बोरसे, ३. रूद्राणी सोळंके. १४ वर्षांखालील मुले : १. नील बदाणे, २. सोपान दौड, ३. रूद्र पुंड. १७ वर्षांखालील मुले : १. मोईन सय्यद, २. गणेश शिंदे, ३. अविनाश चव्हाण.
८०० मीटर धावणे : १४ वर्षांखालील मुली : १. वैष्णवी पाठसवाणे, २. दिशा इंगळे, ३. हर्षदा मुरकुटे. १७ वर्षांखालील मुली : १. वैष्णवी भावले, २. दिव्या बोरसे, ३. आकांक्षा क्षीरसागर. १४ वर्षांखालील मुले : १. उत्कर्ष शेवाळे, २. प्रणम्य भोजने, ३. आर. एन. जाधव. १७ वर्षांखालील मुले : १. कार्तिक बैनाडे, २. गणेश शिंदे, ३. कृष्णा पंडुरे.
व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल
१४ वर्षांखालील मुली : १. द जैन इंटरनॅशनल स्कूल, २. बळीराम पाटील शाळा. १४ वर्षांखालील मुले : १. सरस्वती भुवन प्रशाला, २. द जैन इंटरनॅशनल. १७ वर्षांखालील मुले : १. सरस्वती भुवन प्रशाला, २. द जैन इंटरनॅशनल. १७ वर्षांखालील मुली : १. शारदा मंदिर, २. सरस्वती भुवन प्रशाला.