
पीवायसी- पुसाळकर प्रीमियर क्रिकेट लीग
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने अकराव्या पीवायसी- पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत कोतवाल युनिकॉर्न, नॉक ९९ पुणेरी बाप्पा, सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स, बदामीकर स्टार्स, लाइफसायकल स्नो लेपर्ड्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रौनक टिळक (४८) याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर कोतवाल युनिकॉर्न संघाने बेलवलकर बॉबकॅट्स संघावर २ धावांनी विजय मिळवत पहिला विजय नोंदवला. दुसऱ्या लढतीत आत्मन बागमार (४५) याने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर नॉक ९९ पुणेरी बाप्पा संघाने जीएम टायफून्स संघाचा ४ गडी राखून पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली.
इशांत रेगे नाबाद ६८ व १-७ याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स संघाने जीएम टायफून्स संघाचा ३७ धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. सिद्धार्थ बदामीकरच्या नाबाद ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर बदामीकर स्टार्स संघाने ए अँड ए शार्क्स संघाचा ११ धावांनी पराभव केला. अक्षय ओक नाबाद ३० धावांच्या जोरावर लाइफसायकल स्नो लेपर्ड्स संघाने चिताज संघावर १६ धावांनी विजय मिळवला. ओजस साबडे (नाबाद ६८ )याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर बेलवलकर बॉबकॅट्स संघाने ट्रूस्पेस नाईट्स संघावर २९ धावांनी विजय मिळवला.