
- महिला गटात अदिती संघ अजिंक्य
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवात स्थावर मालमत्ता विभागाच्या संघाने क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले तर महिला गटात अदिती संघाने विजयी ढाल जिंकली.
क्रीडा विभागाच्या वतीने नामविस्तार दिनाचे औचित्य साधून कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, क्रिकेट, रस्सीखेच व संगीत-खुर्ची पुरुष व महिला गटांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बॅडमिंटन स्पर्धेमध्ये स्पर्धेत एकूण ६७ पुरुष खेळाडू व महिला गटातून एकूण २२ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
बॅडमिंटन स्पर्धा एकेरी गटात बाद पद्धतीने खेळविण्यात आली. बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. या स्पर्धेत पुरुष गटात कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी विजेतेपद पटकावले. डॉ विनय लोमटे (केमीकल टेक्नोलॉजी) यांनी उपविजेतेपद संपादन केले. अजिंक्य चव्हाण यांनी तिसरे स्थान मिळवले. डॉ प्रवीण एन्नावार चौथ्या स्थानी राहिले. महिला गटात स्वाती पगडे (पीजी फेलोशीप) प्रथमस्थानी, जिज्ञासा वानखेडे द्वितीय स्थानी, डॉ सोनाली क्षीरसागर (एनएसएस समनव्यक) तिसऱ्या स्थानी व पद्मा तायडे (वाणिज्य व व्यवस्थापन) चौथ्या स्थानी राहिल्या. बॅडमिंटन स्पर्धा डॉ सुनील गायसमुद्रे यांच्या देखरेखीत संपन्न झाल्या. डॉ कैलास पाथ्रीकर, डॉ संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा सुरू आहेत.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ संदीप जगताप, डॉ मसुद हाश्मी, सुरेंद्र मोदी, व गणेश कड यांच्या देखरेखीत पार पडत आहेत. क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात १३ संघ सहभागी झाले होते. यामध्ये स्थावर मालमत्ता विभाग व अस्थापना विभागाच्या संघात अंतिम सामना झाला. यामध्ये जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद जिंकले. या संघात जितेंद्र पाटील (कर्णधार), रवींद्र काळे, जय देशमाने, रवी पारधे, रवींद्र खताळ, बलभीम मार्कंड, प्रशांत शिनगारे, कार्तिक चव्हाण, अजय सलामपुरे, सुनील कणिसे, रियाज मुल्ला, शेख मोईज, रणजीत तांगडे, तणवीर अहमद, गणेश खरात या खेळाडूंचा सहभाग होता. कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, डॉ कैलास पाथ्रीकर, नितीन गायकवाड, मनोज शेटे यांनी संघास मार्गदर्शन केले. रोहित सलामपुरे यांचा अस्थापन संघ उपविजेता ठरला.
महिला गटात सविता कदम यांच्या नेतृत्वाखाली अदिती संघाने विजेतेपद पटकाविले. या संघात शिल्पा हिरवाळे, स्वाती पगडे, संगीता भिंगारे, कविता शेटे, कविता जाधव, अनिता तायडे, समिधा केवट, सुनंदा हिरवळे, सुनीता भुजबळ, मीनाक्षी जाधव यांचा सहभाग होता. उपकुलसचिव हेमलता ठाकरे, संजय लांब यांनी संघास मार्गदर्शन केले. तर महिला गटात डॉ अनिता पाटील यांचा दामिणी संघ उपविजेता ठाला.