परभणी जिल्ह्याचा नेटबॉल संघ जाहीर 

  • By admin
  • January 15, 2025
  • 0
  • 46 Views
Spread the love

आशिष, साक्षी, अथर्व, प्रीतीची कर्णधार म्हणून निवड 

परभणी : राज्यस्तरीय ज्युनियर व सबज्युनियर नेटबॉल स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. आशिष गायकवाड, साक्षी चव्हाण, अथर्व आगरकर व प्रीती काकडे या खेळाडूंची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशन व धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८व्या ज्युनिअर व सब ज्युनिअर राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन पिंपळादेवी हायस्कूल, मोहाडी उपनगर, धुळे या ठिकाणी करण्यात आले आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परभणी जिल्हा नेटबॉल निवड चाचणी सिटी क्लब नेटबॉल मैदान या ठिकाणी घेण्यात आली. या निवड चाचणीतून १९ वर्षांखालील मुलांच्या संघात आशिष गायकवाड (कर्णधार), सतीश खरोडे (उपकर्णधार), पांडुरंग कणे, आदित्य कांबळे, परमेश्वर जनजवळे, कोंडिबा काळे, अजय गायकवाड, अभिषेक गाढवे, सोमेश बायस, नागेश भडके, शाम चव्हाण, विठ्ठल कणे या खेळाडूंची निवड करण्यात आली. या संघाच्या प्रशिक्षकपदी महेशकुमार काळदाते यांची तर व्यवस्थापक म्हणून कैलास माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

१९ वर्षांखालील मुलींच्या संघात साक्षी चव्हाण (कर्णधार), रोहिणी उफाडे (उपकर्णधार), नंदिनी भोरे, अश्विनी लोखंडे, रागिणी वानखेडे, श्रेया टेकाळे, शितल शिंदे, प्रीती काकडे, तेजल शेंगुळे, दिव्या श्रीखंडे, मयुरी मस्के, अक्षरा नरवडे, या खेळाडूंची निवड करण्यात आली. या संघाच्या प्रशिक्षकपदी पूजा श्रीखंडे आणि व्यवस्थापक म्हणून मयुरी जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

१६ वर्षांखालील मुलांच्या संघात अथर्व आगरकर (कर्णधार), विशाल चौधरी (उपकर्णधार), सम्राट वाढवे, दीपक दुभळकर, सुरेश खोकले, सुनील टिपरकर, गोविंद अवरगंड, निलेश भडके, आयुष लोणसने, वैभव ताटे, भागवत दुभळकर या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी पांडुरंग हजारे यांची तर व्यवस्थापक म्हणून अनिल डवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

१६ वर्षांखालील मुलींच्या संघात प्रीती काकडे (कर्णधार), तेजल शेंगुळे (उपकर्णधार), श्रावणी सोनटक्के, प्रतीक्षा शेटे, स्वाती मोरे, संस्कृती पोपळघट, अश्विनी जावळे, साक्षी गजेवाड, नंदिनी दर्षणकर, विद्या शेवाळे, श्वेता परदेशी, गायत्री गोरे या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी रिचा नऊसुपे यांची तर व्यवस्थापक म्हणून सानिया गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परभणी जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव कैलास माने, राष्ट्रीय प्रशिक्षक महेशकुमार काळदाते, शेषराव भांगे, हनुमान देवडे, ज्ञानेश्वर बायस, रामदास वानखेडे, नंदकिशोर कुंडगीर, माधव जाधव, मनोज टेकाळे, बिभीषण जाधव, निवड समिती सदस्य मनीष जाधव, विश्वास पाटील, गणेश सौदागर, प्रणव यादव, पूजा श्रीखंडे, अनिल डवरे, अजय काळे यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्याचा नेटबॉल संघ जाहीर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *