
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने सीनियर महिलांच्या संघाची निवड चाचणी शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही निवड चाचणी गरवारे मैदानावरील विशाल गीते यांच्या संभाजीनगर इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट, कलाग्राम शेजारी छत्रपती संभाजीनगर खेळपट्टीवर घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, पारस छाजेड, सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर आणि कोषाध्यक्ष सुभाष पटेल यांनी केले आहे.