
नागपूर (सतीश भालेराव) : खासदार क्रीडा महोत्सवात क्रिकेट स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स शिक्षक संघाने दणदणीत विजय नोंदवत आगेकूच केली.
खासदार क्रीडा महोत्सव प्रोफेशनल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डीएनसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कोठे, क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ देवेंद्र वानखेडे, स्पर्धा प्रमुख राजू वैद्य, संजय देशपांडे, जयंत जिचकार, सुनील बनकर, सचिन वाघ, सदाशिव बोलधन व इतर मान्यवर उपस्थित होते.
खासदार क्रीडा महोत्सवात पहिल्या प्रोफेशनल क्रिकेट सामन्यात स्कूल ऑफ स्कॉलरच्या क्रीडा व इतर शिक्षकांनी पहिल्याच सामन्यात विजय साकारला. सहा षटकांमध्ये सलामीचे फलंदाज सुरज व अझहर यांनी चौकार-षटकार मारत संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. अझहर याने ३७ धाावा काढल्या. सुरज याने ३३ धावांचे योगदान दिले. त्यानंतर सुशील आंबेकर याने तीन धावा काढल्या. स्कूल ऑफ स्कॉलर्स संघाने ७३ धावसंख्या उभारली.
आदर्श विद्यामंदिर या शाळेसमोर विजयासाठी ७४ धावांचे लक्ष्य होते. आदर्श विद्यामंदिर संघाने सहा षटकात ४१ धावा काढल्या. त्यांना ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अझर याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.