धाराशिव : धाराशिव जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे २० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय सब ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ८, १०, १२, १४ वर्षांखालील गटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेसाठी धाराशिव ज़िल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव येथे २० जानेवारी घेण्यात येणार आहे. २० जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता निवड चाचणी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
निवड चाचणी स्पर्धेत विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्यात धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप, गोळाफेक, लांब उडी असा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धेमधून विजयी खेळाडूंची निवड धाराशिव जिल्हा संघात केली जाणार आहे. खेळाडूंनी आधार कार्ड ,जन्म दाखला सोबत आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या लिंक वर नोंदणी करावी
या स्पर्धेसाठी खेळाडूंनी १८ जानेवारीपर्यंत आपली नावे नोंदवावीत. या स्पर्धेसाठी राजेंद्र सोलनकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून सुरेंद्र वाले, मुनीर शेख ,राजेश बिलकुले, ज्ञानेश्वर भुतेकर, सचिन पाटील, रोहित सुरवसे, रुषिकेश काळे, प्रिया घोडके यांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून संजय कोथळीकर व अजिंक्य वराळे यांची निवड करण्यात आली आहे.
या निवड चाचणी स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप व सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी माऊली भुतेकर (9404193674), रोहित सुरवसे (7796756866) यांच्याशी संपर्क साधावा.