
छत्रपती संभाजीनगर : पुणे येथे १९ ते २१ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर ज्युदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र ब संघाच्या व्यवस्थापकपदी जिल्हा संघटनेचे सहसचिव आणि वरिष्ठ प्रशिक्षक विश्वास जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, शहर संघटनेचे अध्यक्ष डॉ अजय दंडे, उपाध्यक्ष भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, सचिव अतुल बामनोदकर, कोषाध्यक्ष सुरेश छापरवाल, विश्वजीत भावे, संजय परळीकर, प्रसन्न पटवर्धन, अमित साकला, भीमराज रहाणे, कुणाल गायकवाड, अशोक जंगमे आदींनी अभिनंदन केले आणि महाराष्ट्र ब संघास शुभेच्छा दिल्या.