
छत्रपती संभाजीनगर : वरिष्ठ गट राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा टेनिक्वाईट संघ जाहीर करण्यात आला आहे. हा संघ उदगीर येथे स्पर्धेसाठी दाखल झाला आहे.
महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या मान्यतेने उदगीर येथे राज्य टेनिक्वाईट स्पर्धा होत आहे. उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या वरिष्ठ गट स्पर्धेकरिता पंच म्हणून डॉ अभिजीत देशमुख यांची राज्य संघटनेतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर मुलांच्या संघात दत्तात्रय पिंपरकर (कर्णधार), धनंजय घोरपडे, प्रणव काकडे, पोरस जगताप, बालाजी खांडेकर, यजत खोसे या खेळाडूंचा समावेश आहे. मुलींच्या संघात ऋतुजा भाबडे (कर्णधार), मानसी नागलगाव, श्रावणी चव्हाण, साक्षी वाणी, साक्षी गडकरी, अनुष्का देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा टेनिक्वाईट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, संघटनेचे मार्गदर्शक डॉ संदीप जगताप, डॉ कैलास शिवणकर, डॉ रोहिदास गाडेकर, हर्षल मोगरे, अरुण भोसले, रवींद्र माळी, विलास राजपूत यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.