सेलू येथे दर्जेदार क्रिकेट स्टेडियम उभारणार

  • By admin
  • January 17, 2025
  • 0
  • 87 Views
Spread the love

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे प्रतिपादन

सेलू : मराठवाड्यातील सुसज्ज दर्जाचे क्रिकेट स्टेडियम सेलू शहरात उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी शुक्रवारी नितीन लहाने चषक क्रिकेट स्पर्धेला सदिच्छा भेट प्रसंगी केले.

यावेळी नितीन लहाने कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार हरिभाऊ लहाने, सचिव संदीप लहाने, डॉ संजय रोडगे, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराव कदम, भाजपा शहराध्यक्ष अशोक अंभोरे, कपिल फुलारी, शिवहरी शेवाळे, अशोक सेलवाडीकर, पांडुरंग गजमल, पोलीस उपनिरिक्षक माधव लोकूलवार, भागवत दळवे, बाबा काटकर, अविनाश शेरे, पांडुरंग कावळे, गजानन गात आदींची उपस्थिती होती.

सेलू शहरात नितीन लहाने कला व क्रीडा मंडळाच्यावतीने निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मागील २५ वर्षांपासून करण्यात आहे. स्पर्धेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या स्पर्धेस राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सदिच्छा भेट देवून स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोबत चर्चा करून सेलू शहरात माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाने हे स्टेडियमसाठी जागा उपलब्ध करणार असल्याने मराठवाड्यातील सुसज्ज क्रिकेटचे स्टेडियम उभारून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होईल. तसेच आमदार आशिष शेलार यांच्याची चर्चा करणार असल्याचेही यावेळी राज्यमंत्री बोर्डीकर यांनी म्हटले.

अक्सर संभाजीनगर संघ विजयी
जालना आणि अक्सर संभाजीनगर संघात झालेल्या लढतीत अक्सर संभाजीनगर संघाने विजयी आगेकूच केली. मुख्याध्यापक संतोष पाटील यांचे हस्ते नाणेफेक करण्यात आली. या प्रसंगी मंडळाचे सचिव संदीप लहाने, राजेश राठोड, गणेश माळवे आदी उपस्थित होते.

काणे जालना संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकात सर्वबाद १०५ धावा केल्या. यात ‌बालाजी खलसे (३२), शिवम डुर्गा (१९), आकाश गोरे (१२) यांनी डावाला आकार दिला. अक्सर संभाजीनगर संघाच्या वतीने यासीन शेख, प्रतीक भालेराव, सिद्दिकी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

अक्सर संभाजीनगर संघाने नऊ षटकात तीन बाद १०५ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला. यात मुकीम शेख (४०), शाश्वत पाठक (५२) यांनी संघाला मोठा विजय मिळवून दिला.

आरजी संभाजीनगरचा मोठा विजय
मालेगाव सीसी आणि आरजी संभाजीनगर यांच्या दुसरा सामना झाला. मालेगाव संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करताना ‌सात बाद १६४ धावा केल्या. यात इम्रान गेल (४२), खालिद जमान (४२), जानी शेख (२९) यांनी शानदार फलंदाजी केली. आरजी संभाजीनगरच्या वतीने मोहम्मद वाशिम याने २ गडी बाद केले. व्यंकटेश ‌सोनवलकर व‌ श्रीकांत कुलकर्णी प्रत्येकी एक गडी बाद केला.

आरजी संभाजीनगर संघाने १४ षटकात दोन बाद १६७ धावा फटकावत आठ विकेटने सामना जिंकला. यात प्रदीप जगदाळे याने ‌६ षटकार व ११ चौकारांच्या मदतीने शतक ठोकून सेलूकरांचे मन जिंकले. ‌आसिफ खान याने ३१ धावा तर ‌अविनाश मुके याने २६ धावांचे योगदान देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मालेगाव संघाच्या वतीने मुजील खान व अन्सारी सोफिया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

सामन्याचे धावते वर्णन शेख यासेर, मोहन बोराडे यांनी केले. गुण लेखण सलमान सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका प्रमुख बाबा काटकर अविनाश शेरे, पांडुरंग कावळे, धनंजय कदम, हमीद अब्दुल, बंडू देवधर, मोहनराजे बोराडे, स्वप्नील राठोड, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *