आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सुमेध तळवेलकर यांना पीएच डी पदवी प्रदान

  • By admin
  • January 17, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love

जळगाव : आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू डॉ. सुमेध प्रदीप तळवेलकर यांना एमजीएम विद्यापीठ येथे क्रीडा व्यवस्थापन समारंभात कुलगुरू डॉ. विलास सपकाळ आणि रणित किशोर यांच्या हस्ते पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली. 

सुमेध तळवेलकर यांना प्रमुख मार्गदर्शन संचालक डॉ सुरिंदर सेठी यांचे लाभले. सुमेध तळवेलकर हे एक आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू असून त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील यशासाठी धोरणात्मक मॉडेल म्हणून भारतीय क्रीडा प्रतिभा योजनेची रचना आणि विकास’ या विषयावर संशोधन केले.

डॉ सुमेध तळवेलकर यांना पीएच डी पदवी प्रदान झाल्याबद्दल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ प्रदीप तळवेलकर, मंजुषा तळवेलकर, डॉ हर्षल तारे, तसेच गोकुळ तांदळे, डॉ दिनेश वंजारे, राष्ट्रीय सॉफ्टबॉल प्रशिक्षक गणेश बेटूदे, सॉफ्टबॉल खेळाडू भीमा मोरे आदींनी अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *