
व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : आमेर बदाम, मोहम्मद आमेर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १८व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत डॉक्टर्स इलेव्हनने जिल्हा वकील बार असोसिएशन संघाचा चुरशीच्या सामन्यात १८ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात एमआर इलेव्हनने बडवे ऑटो कॉम्प्स संघावर ६४ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात आमेर बदाम आणि मोहम्मद आमेर यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात डॉक्टर्स इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १५१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येच्या प्रत्युतरात जिल्हा वकील बार असोसिएशन संघ २० षटकात सहा बाद १३३ धावा करण्यात यशस्वी ठरला. डॉक्टर्स इलेव्हनने १८ धावांनी सामना जिंकून आगेकूच केली.

या सामन्यात डॉ मयूर जे (४०), अनंता बडादे (३५), दिनकर काळे (३४) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत रिझवान अजिज शेख (३-११), आमेर बदाम (३-३६) व दिनकर काळे (२-२१) यांनी प्रभावी गोलंदाजी करत यश संपादन केले.
दुसऱ्या सामन्यात एमआर इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सहा बाद १९३ धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. बडवे ऑटो कॉम्प्स संघ २० षटकात सहा बाद १२९ धावा काढू शकला. एमआर इलेव्हनने ६४ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात मोहम्मद आमेर (८५), सतीश काळुंके (४०), सुरज गोंड (३७) यांनी धमाकेदार फलंदाजी करुन मैदान गाजवले. गोलंदाजीत सय्यद जलिस (२-१२), सुरज वाघ (२-१३), फिरदी (१-४) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक : १) डॉक्टर्स इलेव्हन : २० षटकात नऊ बाद १५१ (गिरीश गाडेकर १६, कार्तिक बाकलीवाल ८, मयूर जे ४०, राजेश चौधरी २५, मशुदुल सय्यद ६, आमेर बदाम ७, राजेंद्र चोपडा १२, इतर २९, रिझवान अजिज शेख ३-११, दिनकर काळे २-२१, मोहित घाणेकर १-३८, अनंता बडादे १-२३) विजयी विरुद्ध जिल्हा वकील बार असोसिएशन टीम : २० षटकात सहा बाद १३३ (रिजवान अजिज शेख १४,क साईसागर अंबिलवादे २७, ओंकार पाटील १०, दिनकर काळे ३४, अनंता बडादे नाबाद ३५, आमेर बदाम ३-३६, राहुल गंगावणे १-२०, राजेश चौधरी १-१५, मयूर जे १-२१). सामनावीर : आमेर बदाम.
२) एमआर इलेव्हन : २० षटकात सहा बाद १९३ (अदनान अहमद २७, मोहम्मद आमेर ८५, अनिरुद्ध शास्त्री २०, सतीश काळुंके नाबाद ४०, शैलेंद्र लाड १-३०, ज्योतिबा विभुते १-५७, सुरज गोंड १-३१, पंकज चव्हाण १-२९, सचिन चव्हाण १-४२) विजयी विरुद्ध बडवे ऑटो कॉम्प्स संघ : २० षटकात सहा बाद १२९ (सुरज गोंड ३७, निखिल कडताने १८, पंकज चव्हाण ९, ज्योतिबा विभुते १०, विकास थोटे नाबाद २७, सचिन चव्हाण १२, सुरज वाघ २-१३, सय्यद जलिस २-१२, फिरदी १-४, माजेद खान १-१३). सामनावीर : मोहम्मद आमेर.