
मसिआ प्रीमियर लीग : प्रशांत गोरे, रणजीत पाटील, समीर सोनवणे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : मसिआ प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत कॅनपॅक टायटन्स, रेयॉन मसिआ वॉरियर्स, मधुरा बिल्डर्स या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच केली आहे. या सामन्यांमध्ये प्रशांत गोरे, रणजित पाटील आणि समीर सोनवणे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात कॅनपॅक टायटन्स संघाने एआयटीजी अॅव्हेंजर्स संघाचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यात एआयटीजी संघाने प्रथम फलंदाजी करत १५ षटकात नऊ बाद ५८ धावा काढल्या. कॅनपॅक संघाने ९.२ षटकात सहा बाद ५९ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला.

या सामन्यात गणेश जाधव (१७), शिवाजी दातार (१६), अनंता कोळसे (९) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत प्रशांत गोरे (२-६), मधुकर इंगोले (२-११), नितेश विंचूरकर (२-२८) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात रेयॉन मसिआ वॉरियर्स संघाने प्रीमियम ट्रान्समिशन संघाचा ५० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रेयॉन मसिआ वॉरियर्स संघाने १५ षटकात चार बाद १४३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रीमियम ट्रान्समिशन संघाने १५ षटकात सात बाद ९३ धावा काढल्या.
या सामन्यात मंगेश निटूरकर (३८), रणजीत पाटील (३५), राजेंद्र मगर (२६) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत संदीप पाटील (२-१२), रणजीत पाटील (१-१३) व शोएब (१-१५) यांनी सुरेख स्पेल टाकला.

तिसऱ्या सामन्यात सान्या मासिआ नाईट्स संघाने प्रथम फलंदाजी करत १५ षटकात सात बाद ११४ धावा काढल्या. मधुरा बिल्डर्स संघाने १४.५ षटकात चार बाद ११८ धावा फटकावत सहा विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात अभय भोसले (४७), गजानन भानुसे (३६), गिरीश खत्री (२९) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. गोलंदाजीत समीर सोनवणे (२-१६), अविनाश शिंदे (२-१९) व गिरीश खत्री (१-२०) यांनी सुरेश स्पेल टाकला.
संक्षिप्त धावफलक : १) एआयटीजी अॅव्हेंजर्स संघ : १५ षटकात नऊ बाद ५८ (गौरव भोगले ८, अनंता कोळसे ९, भागवत शेळके ८, गणेश जाधव नाबाद १७, प्रशांत गोरे २-६, हंसराज राय १-७, शिवाजी दातार १-४, दशरथ भिवटे १-३, संतोष इंगळे १-९, लालन कुमार १-१४) पराभूत विरुद्ध कॅनपॅक टायटन्स संघ : ९.२ षटकात सहा बाद ५९ (दुर्गेश देशपांडे ७, लालन कुमार ७, शिवाजी दातार १६, प्रशांत गोरे ६, सेल्वा गणपथी नाबाद ६, विजय पाटील नाबाद ८, मधुकर इंगोले २-११, नितेश विंचूरकर २-२८, अतिक शेख १-३). सामनावीर : प्रशांत गोरे.
२) रेयॉन मसिआ वॉरियर्स संघ : १५ षटकात चार बाद १४३ (निकित चौधरी १७, धर्मेंद्र वासानी १२, राजेंद्र मगर २६, मंगेश निटूरकर ३८, रणजीत पाटील नाबाद ३५, सुहास १-१६, शोएब १-१५, संतोष पांचाळ १-३४) विजयी विरुद्ध प्रीमियम ट्रान्समिशन संघ : १५ षटकात सात बाद ९३ (मुंढे ८, भूषण साबळे २४, सचिन मिटकरी २२, सुहास नाबाद १४, संदीप पाटील २-१२, मंगेश निटूरकर १-१७, रणजीत पाटील १-१३, धर्मेंद्र वासानी १-१९). सामनावीर : रणजीत पाटील.
२) सामनावीर : सान्या मसिआ नाईट्स संघ : १५ षटकात सात बाद ११४ (गिरीश खत्री २९, निखिल कदम २४, गजानन भानुसे नाबाद ३६, माधव हाडवे ८, अविनाश शिंदे २-१९, समीर सोनवणे २-१६, राहुल तोबरे १-३०) पराभूत विरुद्ध मधुरा बिल्डर्स संघ : १४.५ षटकात चार बाद ११८ (अजय देशमुख २६, समीर सोनावणे ७, अभय भोसले नाबाद ४७, जयेश पाटील १३, अलोक गोर्डे नाबाद १२, गिरीश खत्री १-२०, नितीन कोडवकर १-१४, प्रमेश माकडे १-२८, माधव हाडवे १-१६). सामनावीर : समीर सोनवणे.