
कर्नल परशुराम वाघ यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : ‘भारतीय सैन्यदलामध्ये असलेल्या विविध संधीविषयी सखोल माहिती देताना कर्नल परशुराम वाघ यांनी देशसेवेसोबत करिअर घडवण्यासाठी भारतीय सैन्यदल एक उत्तम पर्याय असल्याचे सांगितले.
कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय संरक्षण क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ या विषयावर लेफ्टनंट कर्नल परशुराम वाघ रेजिमेंट ऑफ आर्टिलरी इंडियन आर्मी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ शशिकांत डिकले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व विद्यार्थ्यांना इतर क्षेत्रासोबतच भारतीय सैन्यदलात आलेल्या नोकरीच्या संधी याबाबत माहिती घेऊन त्या क्षेत्रामध्ये करिअर करावे, असे आवाहन केले.
कर्नल वाघ यांनी भारतीय सैन्यदलामध्ये असलेल्या विविध संधी यांची विस्तृतपणे माहिती दिली. अध्ययनासोबतच जीवनात शिस्त लावण्यासाठी तसेच देशसेवा करण्यासाठी भारतीय सैन्यदलातील विविध स्वरूपाच्या वेगवेगळ्या पदासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या क्षेत्रात प्रचंड नोकऱ्या उपलब्ध आहेत असे प्रतिपादन केले. विशेषतः तंत्रशिक्षण क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी डिप्लोमा किंवा डिग्रीच्या आधारावर विविध पदांसाठी अर्ज करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्नल वाघ यांनी केले.
कर्नल वाघ हे सध्या जम्मू काश्मीर मधील भारत- पाकिस्तान सीमेजवळ उरी याठिकाणी कार्यरत आहेत. भारतीय सैन्याला अतिशय दुर्गम भागांमध्ये राहून देशाची सेवा करावी लागते. तसेच त्याबाबतचे काही व्हिडीओ तसेच फोटाग्राफ विद्यार्थ्यांना दाखून प्रेरित केले.
या उपक्रमाच्या आयोजन व यशस्वीते बाबत छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ शशिकांत डिकले, उपप्राचार्य प्रा चंद्रशेखर राहणे, प्रा कैलास तिडके, प्रा माधव नरंगले, प्रा महेश मोरे, प्रा संदीप मदन, प्रा रुपाली पोफळे, प्रा सोनल बोराखडे, प्रा सागर आव्हाळे, संजय पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.