
शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा
जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने आयोजित १४, १७, १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या शालेय शालेय जिल्हास्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल सिद्धनाथ वाडगाव येथे शनिवार घेण्यात आली.
या स्पर्धेत दहा मुलांच्या व सहा मुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला. मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांध्ये भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूरच्या संघाने श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल संघाचा २-१ असा पराभव केला. मुलींच्या सामन्यात श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल संघाने ज्ञानदा इंग्लिश स्कूल संघाचा २-० असा पराभव करत विजेतेपद मिळवले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात न्यू हायस्कुल गंगापूरच्या संघाने वंडर इंटरनॅशनल स्कूल संघाचा २-१ असा पराभव केला तर मुलींच्या गटात न्यू हायस्कुल गंगापूरने २-० अशा सरळ सेट मध्ये ज्ञानदा इंग्लिश स्कूल संघाचा पराभव केला.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात शरद रूरल पब्लिक स्कूल संघ विजेता ठरला. त्यांनी भागीरथी विद्यालय नालेगाव संघाचा २-० असा पराभव केला. तर मुलींमध्ये भागीरथी विद्यालय नालेगाव संघाने श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल संघाचा पराभव केला.
सर्व विजयी संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. टेनिस व्हॉलीबॉल संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, विभागीय सचिव प्रमोद महाजन, क्रीडा शिक्षक अंबादास उंडरे, अब्दुल बागेस, भारत निंबाळकर, प्रवीण पुलाटे, नारायण राजपूत, विकी कहाटे, विलास राजपूत, गजानन राऊत आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला होता.