
मासिया प्रीमियर लीग : संदीप खोसरे, कौशिक पाटील, मयूर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एक्स झोन स्कोडा वॉरियर्स, सीमेन्स एनर्जीझर्स आणि दिग्विजय जीएसटी मार्व्हल्स या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात संदीप खोसरे, कौशिक पाटील आणि मयूर यांनी सामनावीर किताब संपादन केला.
एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात एमआयडीसी रुषिकेश चॅलेंजर संघाने प्रथम फलंदाजी करत १५ षटकात आठ बाद ७७ धावा काढल्या. एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघाने १०.२ षटकात चार बाद ७८ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात संदीप खोसरे (२३), युवराज राऊत्रे (१७), प्रवीण नागरे (१५) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत बन्सी गपत (२-६), संदीप खोसरे (२-१०) व प्रमोद विश्वास (२-१७) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात सीमेन्स एनर्जीझर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात चार बाद १२९ धावसंख्या उभारली. कॅनपॅक टायटन्स संघ या धावसंख्येचा पाठलाग करताना १५ षटकात सहा बाद १०६ धावा काढू शकला. सिमेन्स एनर्जीझर्स संघाने २३ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात कौशिक पाटील (४४), अजित पाटील (३२), वसीम (२६) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत निलेश जाधव (२-१४), हंसराज राय (१-१४), लालन कुमार (१-५) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
तिसऱ्या सामन्यात दिग्विजय जीएसटी मार्व्हल संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात पाच बाद १५० धावा काढल्या. प्रत्युत्तरात प्रीमियम ट्रान्समिशन संघाने १५ षटकात सात बाद १२३ धावा काढल्या. दिग्विजय जीएसटी संघाने २७ धावांनी सामना जिंकला.
या लढतीत मयूर (५०), सचिन (३८), गणेश सिरसवाड (३३) यांनी शानदार फलंदाजी केली. गोलंदाजीत संतोष राजपूत (२-२०), राहुल इंगळे (२-२३) व राहुल आमले (२-२९) यांनी प्रभावी स्पेल टाकत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : १) एमआयडीसी रुषिकेश चॅलेंजर : १५ षटकात आठ बाद ७७ (नितीन कणिसे ९, युवराज राऊत्रे १७, संदीप हरणे नाबाद १२, इतर २०, प्रमोद विश्वास २-१७, बन्सी गपत २-६, संदीप खोसरे २-१०, शेख नजीम १-१२) पराभूत विरुद्ध एक्स झोन स्कोडा वॉरियर्स : १०.२ षटकात चार बाद ७८ (संदीप राठोड ९, संदीप खोसरे २३, प्रवीण नागरे १५, दीपक जम्मुवाल १३, शेख इद्रिस नाबाद १०, मंगेश गरड नाबाद १, युवराज राऊत्रे २-२४, नितीन कणिसे १-११, गणेश चव्हाण १-१३). सामनावीर : संदीप खोसरे.
२) सीमेन्स एनर्जीझर्स : १५ षटकात चार बाद १२९ (अजय गव्हाणे १६, अजित पाटील ३२, चारुदत्त भोसले १३, कौशिक पाटील ४४, सतीश पाठक नाबाद ११, निलेश जाधव नाबाद २, प्रशांत गोरे १-३२, हंसराज राय १-१४, संतोष इंगळे १-२०, लालन कुमार १-५) विजयी विरुद्ध कॅनपॅक टायटन्स : १५ षटकात सहा बाद १०६ (दशरथ भिवटे १४, दुर्गेश देशपांडे ६, लालन कुमार ११, वसीम २६, संतोष इंगळे ११, सेलवा गणपती १६, प्रशांत गोरे नाबाद २, हंसराज राय नाबाद ४, इतर १६, निलेश जाधव २-१४, अजय गव्हाणे १-१७, कौशिक पाटील १-२७). सामनावीर : कौशिक पाटील.
३) दिग्विजय जीएसटी मार्व्हल : १५ षटकात पाच बाद १५० (जालिंदर कदम १०, अंकुश नखाते २८, राहुल आमले ११, मयूर नाबाद ५०, गणेश सिरसेवाड ३३, राहुल इंगळे २-२३, शोएब १-३५) विजयी विरुद्ध प्रीमियम ट्रान्समिशन : १५ षटकात सात बाद १२३ (सचिन ३८, शोएब १४, भूषण साबळे १४, रवी लाखोले ९, मुंढे नाबाद ३२, राहुल आमले २-२९, संतोष राजपूत २-२०, मयर १-२०, अंकुश नखाते १-२३). सामनावीर : मयूर.