
पुणे : पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या वतीने येत्या गुरुवारी (२३ जानेवारी) जिल्हास्तरीय निमंत्रित बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे आजीव अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निमंत्रित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा भवानी पेठ येथील जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे होणार आहे. यामध्ये कब क्लास, कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनियर, युथ, वरिष्ठ गट मुले व मुली अशा सहा गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत अनेक माजी राष्ट्रीय खेळाडू व पुरस्कार विजेते उपस्थित रहाणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी २२ जानेवारी रोजी दुपारी साडेचार ते सहा या वेळेत करण्यात येणार आहेत. ही स्पर्धा गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू होईल. अधिक माहितीसाठी अमोल सोनवणे (९०२२४७१९०६), बंडू गायकवाड (८८०५७१९४०४), रॉबर्ट दास (९९२३६५५५२) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी केले आहे.