
नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप ः त्र्यंबकराज संघ उपविजेता
नाशिक ः नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत व्ही डी के फाऊंडेशन संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावणाऱया हर्षवर्धन, शिवांग सिंग, चिराग, नील, आदित्य, श्लोक, गार्गी, ईश्वरी, राजवी, सिया, गुंजन अनुष्का हे खेळाडू बेस्ट अॅथलिट पुरस्काराचे मानकरी ठरले.
विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ६ वर्षे, ८ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे, १४ वर्षे आणि १६ वर्षे मुले आणि मुली या सहा वयोगटात घेण्यात आली. या स्पर्धेत या विविध वयोगटामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची बेस्ट अॅथलिट म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळाला. यामध्ये व्ही डी के स्पोर्ट्स फाऊंडेशन या संघाच्या खेळाडूंनी सर्व गटामध्ये उत्तम कामगिरी नोंदवत तब्बल २०० गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्रंबकेश्वरच्या त्रंबकराज या संघाने ८७ गुण मिळवत सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. तर रनिंग ९९ क्लब या संघाने ७७ गुणांसह सर्वसाधारण तृतीय स्थान मिळविले.
वैयक्तिक कामगिरीत शिवांगसिंग राठोड, हर्षवर्धन काळे, चिराग सोनावणे, नील वणार, आदित्य राठोड आणि श्लोक काठे यांनी आपल्या गटामध्ये उत्तम कामगिरी नोंदवत बेस्ट अॅथलिटचा बहुमान मिळविला.
मुलींमध्ये ईश्वरी कार्लेकर, गार्गी उगले, राजवी व्यवहारे, सिया कडलग, गुंजन चांडक आणि अनुष्का मोकाटे यांनी आपल्या गटामध्ये चांगली कामगिरी बजावत बेस्ट अॅथलिट असा मान मिळविला.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी, खजिनदार विजय पवार, या स्पर्धेचे आयोजन प्रमुख वैद्यनाथ काळे, संदीप फुगट, बालाजी शिरफुले, सिद्धार्थ वाघ, निकिता दरेकर आदींनी पुढाकार घेतला होता.
स्पर्धेचा अंतिम निकाल
सर्वसाधारण विजेतेपद
१. व्ही. डी. के. स्पोर्ट्स फाऊंडेशन, नाशिक (२०० गुण), २. त्रंबकराज स्पोर्ट्स क्लब, त्रंबकेश्वर (८७ गुण), ३. रनिंग ९९ स्पोर्ट्स क्लब, नाशिक (७७ गुण).
बेस्ट अॅथलिट
शिवांग सिंग राठोड, हर्षवर्धन काळे, चिराग सोनावणे, नील वणार, आदित्य राठोड, श्लोक काठे, ईश्वरी कार्लेकर, गार्गी उगले, राजवी व्यवहारे, सिया कडलग, गुंजन चांडक, अनुष्का मोकाटे.