
छत्रपती संभाजीनगर : संकल्प शिक्षण संस्थेतर्फे आयोजित झेप साहित्य संमेलनात डॉ भरतसिंग सलामपुरे यांना राष्ट्रीय क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
बजाजनगर मधील भोंडवे पाटील पब्लिक शाळेमध्ये झेप साहित्य संमेलन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बी जी गायकवाड तसेच स्वागत अध्यक्ष वेंकटेश मैलापुरे हे होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध जिल्हास्तर राज्यस्तर राष्ट्रीय स्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डॉ भरतसिंग सलामपुरे यांना क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वडगावचे सरपंच सुनील काळे, प्रा बी जी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ सलामपुरे हे दगडोजीराव देशमुख कला व वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय मध्ये शारीरिक शिक्षण विभागांमध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दोन पीएच डी पदवी मिळवली आहेत. तसेच त्यांचे दोन ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. आर्यन पोलीस भरती अकॅडमीचे ते संचालक आहेत. ते विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. डॉ सलामपुरे हे तायक्वांदो खेळाचे ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पंच देखील आहेत.
या पुरस्काराबद्दल तिसगावचे माजी सरपंच मिठूलाल तरैया वाले, मोहनसिंग सलामपुरे, बिरजू लाल तरैया वाले, दीपक भेरे, प्राचार्य डॉ राहुल हजारे, डॉ दिलीप अर्जुने, नवनाथ दळे, मोहन गीते, अण्णासाहेब गफट, बेडगे आदींनी भरत सलामपुरे यांचे अभिनंदन केले आहे.