
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत धुळे संघाने हिंगोली संघाचा ३७ धावांनी पराभव केला. निकिता मोरेची ८९ धावांची खेळी निर्णायक ठरली.
पीकेएस विस्डम क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना झाला. यात धुळे महिला संघाने २० षटकात तीन बाद १६३ धावा काढल्या. हिंगोली महिला संघ १९ षटकात १२६ धावांत सर्वबाद झाला. धुळे संघाने ३७ धावांनी विजय नोंदवला.
या सामन्यात निकिता मोरे हिने ५३ चेंडूत ८९ धावा फटकावल्या. तिने दोन षटकार व चौदा चौकार मारले. उन्नती चौधरी (३७), कल्याणी खंडागळे (३०) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत निकिता मोरे हिने १९ धावांत चार विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. भूमी निंबाळकर हिने १८ धावांत दोन बळी घेतले. अनुश्री हिने २९ धावांत दोन गडी बाद केले.