
सोलापूर : राज्य शालेय डॉजबॉल स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात बी एफ दमाणी प्रशाला संघाने तृतीय स्थान संपादन केले.
यवतमाळ येथे झालेल्या स्पर्धेत पुणे विभागाकडून प्रतिनिधित्व केलेल्या दमाणी प्रशालेने ही कामगिरी केली. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक समर्थ भिमरथी, पवन भोसले व शीतलकुमार शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थेचे स्थानीय अध्यक्ष कालिदास जाजू, सचिव मंगल काबरा, सहसचिव उज्वल तापडिया, मुख्याध्यापिका रेखा पेंबर्ती, पर्यवेक्षक राहुल इंगळे यांनी अभिनंदन केले.
या संघात सार्थक मानकुसकर, अंशुल दरगड, मुजीब शेख, पार्थ सोलंकर, ओंकार तोडकर, अथर्व होंडराव, सुमिरन डिंगणे, प्रद्युम्न उपासे, अथर्व सोनी, समर्थ सलगर, संकेत तगारे, स्वानंद मुळे या खेळाडूंचा समावेश आहे.