
छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय दर्जाचे युवा लेखक, भाषा, शिक्षण, नैतिक शिक्षण पर्यावरण शिक्षण, विधी लोकप्रशासन, समाजकार्य, तत्त्वज्ञान मानसशास्त्र, व्यवस्थापन निसर्गोपचार पत्रकारिता ज्ञान संपादन आणि स्पर्धा परीक्षा इत्यादी विषयावरील विपुल लेखन करणारे, फाउंडर चीप ऑफ एडिटर रेडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमुख डॉ क्रांती महाजन, आशु महाजन यांनी सहकुटुंब डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाला भेट दिली.
विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या भौतिक सोयी सुविधा बरोबरच विद्यापीठ युवकांसाठी व खेळाडूंसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती डॉ जगताप यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी डॉ पंढरीनाथ रोकडे, नूतन रोकडे, डॉ सत्यजीत पगारे, डॉ गायसमुद्रे, डॉ फिरोज पठाण यांच्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक उपस्थित होते.