
पश्चिम विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पाच खेळाडूंची निवड
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या जिल्हा तायक्वांदो संघाने महाराष्ट्र ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत शानदार कामगिरी बजावत आठ पदकांची कमाई केली. त्यात दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंची पश्चिम विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत समीक्षा सोनवणे हिने कॅडेट गटात १४४ किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले. कृष्णा अधाट याने ३२ किलोखालील गटात सुवर्णपदक जिंकले. किंजल सोनवणे हिने कॅडेट गटात १४८ किलोखालील गटात रौप्यपदक संपादन केले. अजिंक्य देवरे याने सीनियर गटात ८० किलोवरील गटात रौप्यपदक जिंकले. अथर्व लहाकर याने ज्युनियर गटात ७३ किलो वजन गटात रौप्य पदकाची कमाई केली. प्रणव गोरे याने कॅडेट गटात १५२ किलोखालील गटात कांस्यपदक जिंकले. दर्शन चौधरी याने ज्युनियर गटात ४८ किलोखालील गटात कांस्य पदकाची कमाई केली. समर्थ सोनवणे याने सब ज्युनियर गटात २० किलोखालील गटात कांस्य पदक जिंकले.
या खेळाडूंना संतोष बस्नेत, सुनील बस्नेत, सुरेश जाधव, शुभम महाजन, दीपक भोईर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या शानदार कामगिरीबद्दल संघटनेच्या अध्यक्ष प्रतिभा सानप आणि सरचिटणीस डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच राजेश सातोनकर, नयन तिवारी, डॉ विक्रम चौबे, संकेत कुलकर्णी, रुपेश शिंदे, कुणाल राठोड, सुरेश जाधव, मोहित देशपांडे, प्रबिन बिश्वकर्मा, अजिंक्य देवरे, अरुण गाडेकर, माधवेश श्रीखंडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज होत असताना जिल्हा तायक्वांदो संघटनेला त्यांच्या उत्कृष्टतेवर विश्वास आहे आणि त्या स्पर्धेतही खेळाडूंनी जिल्हा व राज्यासाठी अधिक यश संपादन करावे अशी शब्दात सचिव डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि जिल्हा संघटना खेळाडूंच्या उन्नतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहील असे सांगितले.
My daughter Rudrani Shirsath also plyaed at Ahilyanagar Open State taekwondo championship 2025 she win Silver medal in Poomse and Bronze Medal in Khurogi and Qulified in Poomse for Western Zonal Taekwondo compitition . She played under 12 from Palghar
आपले मनापासून अभिनंदन. आपण मला बातमी पाठवावी.