राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत मणिपूर विजेता, हरियाणा उपविजेता

  • By admin
  • January 21, 2025
  • 0
  • 106 Views
Spread the love

महाराष्ट्र संघास दोन रौप्य पदकांसह एकूण सहा पदके 

पुणे : पुनीत बालन ग्रुप आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट प्रस्तुत राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेत मणिपूर संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.  हरियाणा राज्याचा संघ सांघिक उपविजेता ठरला.

या स्पर्धेत चार सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदके मिळवून मणिपूर राज्याचा संघ विजेता ठरला तर चार सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्यपदक घेऊन हरियाणा राज्याचा संघ उपविजेता ठरला. मणिपूर राज्याची ५२ किलो खालील गटामध्ये खेळणारी लालचेन बी हिने आमदार मुक्ता टिळक स्मृती चषकावर आपले नाव कोरले. 

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील ५७ किलोवरील गटात खेळणारी कोल्हापूरच्या गीतिका जाधवने आणि ६६ किलोखालील गटात नांदेडच्या नागेश लुटे या दोघांनी रौप्यपदक जिंकले. नाशिकची ५२ किलोखालील गटात खेळणारी ईश्वरी क्षीरसागर हिने कांस्यपदक पटकावले. पौर्णिमा सातपुते, राजवी तळोकार आणि वेदांत पारधी या तीनही यवतमाळच्या खेळाडूंनी कांस्य मिळवले आहे.

महिला विभागात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा प्राप्त करणाऱ्या मणिपूर संघातील लालचेन बी या खेळाडूने तिने खेळलेल्या एकूण पाच सामन्यात सरासरी एक मिनिटाच्या आत, इप्पोन म्हणजे पूर्ण गुण घेत सर्व  प्रतिस्पर्ध्याना पराजित केले आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी ठेवण्यात आलेल्या आमदार मुक्ता टिळक स्मृती चषक पटकावला. 

या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले, महासचिव शैलेश टिळक आणि राज्य तसेच फेडरेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

अंतिम निकाल

सब ज्युनियर मुले विभाग

५५ किलोखालील : १. ध्रुव चौधरी (उत्तर प्रदेश), २. यश (हरियाणा), ३. बुघा एस (अरुणाचल प्रदेश) व निकेतन एम (मणिपूर). ६० किलोखालील : १. राहुल करोल (राजस्थान), २. राकेश (मणिपूर), ३. पार्थ कुमार सैनी (उत्तर प्रदेश) व रागी टेकी (अरुणाचल प्रदेश).  ६६ किलोखालील : १. राम नारायण सिंग (बिहार), २. नागेश लूटे (महाराष्ट्र), ३. बोलम वांगसु (अरुणाचल प्रदेश) व डॅनियल एल (मणिपूर). ६६ किलोवरील गट : १. अरविंद (हरियाणा), २. कौरुवंगबा ए के (मणिपूर), ३. कृष्णा शर्मा (पंजाब) व शौर्य चव्हाण (दिल्ली). 

सब ज्युनियर गट मुली विभाग

४८ किलोखालील : १. चिंगलेम एन ए (मणिपूर), २. रोशनी चकमा (त्रिपुरा), ३. कीर्तीका (उत्तर प्रदेश) व श्वेता गोस्वामी (छत्तीसगड). ५२ किलोखालील गट : १. लांचन बी (मणिपूर), २. आयेशा हसन (जम्मू काश्मीर), ३. इशिका माजी (पश्चिम बंगाल) व  ईश्वरी क्षीरसागर (महाराष्ट्र). ५७ किलोखालील गट : १. भबानी मोरण (आसाम), २. लुना टेकी तारा (अरुणाचल प्रदेश), ३. लिंथोई चानू (मणिपूर) व मानसी (उत्तराखंड). ५७ किलोवरील गट : १. मेहेरप्रीत कौर (पंजाब), २. गीतिका जाधव (महाराष्ट्र), ३. रफुशिया रशीद (जम्मू काश्मीर). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *