
सेलू : रौप्य महोत्सवी नितीन चषक क्रिकेट स्पर्धेत इम्रान लातूर आणि विराट नांदेड या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच केली.

नितीन कला व क्रीडा युवक मंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन महाविद्यालयाचे क्रीडांगणावर ही स्पर्धा होत आहे. इमरान लातूर आणि हुंडेकरी अकॅडमी असा सामना झाला. यात लातूर संघाने प्रथम फलंदाजी इम्रान लातूर संघाने २० षटकात सात गडी बाद १७० धावा केल्या. यात मनोज मस्के (६३), तेजस तोलसंके (२०), वृषभ करवा (२०), आशिष सूर्यवंशी (२०) यांनी सुरेख फलंदाजी केली. हुंडेकरी संघाच्या वतीने आदिनाथ गायकवाडने तीन तर अभिजीत धुहे व गौरव लगड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
१७० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या हुंडेकरी अकॅडमीने २० षटकात ९ बाद १५२ धावा केल्या. यात मोसीन काझी (३२), अभिजीत पठारे (२०), अनिस भोसले (२०), अभिजीत दोहे (१८) यांनी झुंज दिली. इम्रान लातूर संघाकडून भेदक मारा करताना आशिष सूर्यवंशी व सुरेश चव्हाण यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लातूर संघाने हा सामना १८ धावांनी सामना जिंकला.
विराज नांदेड आणि शोल्डर हेल्थ क्लियर मुंबई यांच्यात रंगतदार सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना विराट नांदेड संघाने २० षटकात ९ बाद १७८ धावसंख्या उभारली. यात यश यादव यांनी चौफेर फटकेबाजी करत १५ चौकार आणि एक षटकार ठोकत ८३ धावा केल्या. शाहरुख काझीने २१ तर काझी समोद्दीन ३० धावा फटकावल्या. शोल्डर हेल्थ क्लियर मुंबईच्या वतीने गोलंदाजी करताना पियुष कुनाजे याने ३ गडी तर यशराजने २ गडी बाद केले.
मुंबई संघाने १७८ धावांचे लक्ष गाठताना १९ षटकात सर्वबाद १४४ धावा केल्या. यात सुजन आठवले (२५), अजिंक्य अरुणोदय (७५) यांनी आक्रमक फलंदाजी केली. दीपक खत्रीने १५ धावांचे योगदान दिले. विराट नांदेड संघाच्या वतीने गोलंदाजी करताना शाहरुख काजी चार गडी बाद केले तर सँडी पाटीलने तीन गडी बाद करुन संघाला ३४ धावांनी विजय मिळवून दिला.
सामनावीर पुरस्कार विनोद तरटे, ओमप्रकाश तोष्णीवाल, बाबा काटकर, अजयकुमार डासाळकर, नामदेव डंख, बंडू देवधर आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. या सामन्यात पंच म्हणून सय्यद जमशेद, विद्याधर पांडे यांनी काम पाहिले. सामन्याचे धावते वर्णन पवन फुलमाळी, यासेर शेख, विजय वाघ यांनी केले. गुणलेखन सलमान सिद्दिकी याने केले.