एक्सलन्ट तायक्वांदो अकादमीने जिंकली ५६ पदके

  • By admin
  • January 21, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

ग्लोबल कप तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत पटकावला तिसरा क्रमांक

मुंबई : कर्जत येथे आयोजित ग्लोबल कप तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत एक्सलन्ट तायक्वांदो अकादमीच्या खेळाडूंनी १८ सुवर्णपदक, २१ रौप्य पदक आणि १७ कांस्य पदकांची कमाई केली. एक्सलन्ट अकादमीने एकूण ५६ पदके जिंकून स्पर्धा गाजवत तृतीय क्रमांक संपादन केला.

ग्लोबल कप तायक्वांदो चॅम्पियनशिप ऑर्किड ग्लोबल स्कूल (कर्जत) येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ग्लोबल कप व रायगड जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. क्युरोगी (फायटिंग प्रकार) आणि पुमसे (सादरीकरण प्रकार) मध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या प्रमुख समारंभास तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर सुभाष पाटील, ग्लोबल कपचे संस्थापक राहुल साखरे हे उपस्थित होते.

या चॅम्पियनशिपमध्ये अधिकृत पंच, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र आणि हैदराबाद राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत एक्सलन्ट तायक्वांदो अकॅडमी मिरा रोड ठाण्याच्या या खेळाडूंनी पदके पटकावली. एक्सलन्ट तायक्वांदो अकॅडमीच्या वतीने ४४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये १८ सुवर्णपदक, २१ रौप्यपदक आणि १७ कांस्यपदक असे एकूण ५६ पदके मिळून तिसरे क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले. या स्पर्धेत संघ प्रशिक्षक म्हणून गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर तर संघ व्यवस्थापक म्हणून श्रुतिका जाधव यांनी काम पाहिले.

विजेत्या खेळाडूंचे मीरा-भाईंदर शिवसेना जिल्हा संघटक निशा नार्वेकर, उपशहर संघटक अर्चना कदम, विभाग संघटक कल्पना संदीप पाटील, विभाग संघटक शर्वरी सावंत, शाखा प्रमुख समीर साळवी, सतीश पाण्डेय, मनीष घाटबंधे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, सचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष नीरज बोरसे, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, दुलिचंद मेश्राम, खजिनदार व्यंकटेश करा, अजित घारगे, सतीश खेमस्कर, एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक नीरज बोरसे, लता कलवार, ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलिल झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य प्रमोद कदम यांनी प्रशिक्षक गजेंद्र गवंडर, कांचन गवंडर व सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा अंतिम निकाल

क्योरुगी सुवर्ण पदक विजेते : आर्य तिवारी, अन्विता सावंत, सानिध्या मिश्रा, स्वरा मोहिते, पूर्ती जैन, निती वेलानी, श्री चव्हाण, दिवित पूजारी, विवान माने, अशहर शेख, शौर्य गणवीर, प्रणील नादवडेकर, विराज पांडे, आदित्य सुरेंद्रन.

क्योरु रौप्य पदक विजेते : साक्षी पात्रा, क्षितिजा नादवडेकर, अविक्षा नंदी, समृद्धी जाधव, सोम्या गुप्ता, ओजस्वी पाणंदीकर, सावी खोपकर, सक्षम भरुड, आधवन लाहोटे. युवराज सिंग, समर्थ त्रिपाठी, लोहित कुंदर, विक्रांत पांडे, मंथन रावत, अनिकेत कुलकर्णी, मंथन वापिलकर.

क्योरुगी कांस्यपदक विजेते : काव्या गवंडर, पियुषा जैन, लेखा अगेडकर, क्षितीजा पाटील, खुशी तिवारी, क्षितिज सोनवणे, पार्थ अगेडकर, दिव वेलानी.

पूमसे सुवर्णपदक विजेते : अन्विता सावंत, विबा अग्रवाल, स्वरा मोहिते, क्षितिज सोनवणे.

पूमसे रौप्य पदक विजेता : समृद्धी जाधव, श्रुतिप्रज्ञान साहू, कृष्णा शुक्ल, आदित्य सुरेंद्रन, विवान माने.

पूमसे कांस्यपदक विजेते : तनिष्का पाणंदीकर, पियुषा जैन, पूर्ती जैन, ओजस्वी पाणंदीकर, त्रिशा सिंग, दिव वेलानी, रुद्र रावत, शौर्य गणवीर, अनिकेत कुलकर्णी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *