डॉक्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत डॉ प्रशांत देशपांडे, डॉ हेमलता पवार विजेते

  • By admin
  • January 21, 2025
  • 0
  • 205 Views
Spread the love

टीआरएस फाऊंडेशनतर्फे आयोजन : डॉ दिलीप देशपांडे, डॉ जिनल वकील यांना उपविजेतेपद

छत्रपती संभाजीनगर : टीआरएस फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या टीआरएस डॉक्टरर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत जळ‌गावच्या डॉ हेमलता पवार आणि छत्रपती संभाजीनगरचे डॉ प्रशांत देशपांडे यांनी विजेतेपद पटकावले.

पाटोदा शिवारातील चेसलॅन्ड येथे झालेल्या डॉक्टर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला गटात डॉ हेमलता पवार यांनी विजेतेपद पटकावले. या गटात डॉ जिनल वकील यांनी उपविजेतेपद संपादन केले. डॉ मलिका जोशी यांनी तिसरा क्रमांक मिळवला.

पुरुष गटात डॉ प्रशांत देशपांडे यांनी विजेतेपद पटकावले. डॉ दिलीप देशपांडे यांनी उपविजेतेपद संपादन केले. डॉ लोकेश मंत्री यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत डॉ सुरेश रावते, डॉ निशांत गायधनी, डॉ धनंजय भाले, डॉ प्रणव भाले, डॉ मंगेश कदम, डॉ प्रशांत आकुलवार, डॉ अनिल अंभोरे, डॉ अमित पिलखाने, डॉ श्वेता मोगल यांनी दर्जेदार बुद्धिबळ कौशल्याचे प्रदर्शन केले.

या प्रसंगी उद‌योन्मुख खेळाडू स्वराज विश्वासे, हर्षिता गंगण, शौनक शिंदे, अनय कुलकर्णी, स्मीत पवार यांचा डॉ सुरेश रावते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या स्पर्धेत जळगाव आणि नाशिकच्या डॉक्टर खेळाडूंनी सहभाग घेतला होता. डॉ सुरेश रावते आणि डॉ मंगेश कदम यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेत ४ आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंचा सहभाग होता हे महत्वाचे आहे.

बक्षीस वितरण कार्यक्रमास वुमन इंटरनॅशनल मास्टर तेजस्विनी सागर, अंजली सागर, सुदाम झोटींग, कविता गंगण, डॉ बाळासाहेब शिंदे, प्राची कुलकर्णी, सिया सागर, सुदीप पाटील, विहांग गंगण आदी उपस्थित होते. विलास राजपूत यांनी प्रमुख पंच म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *