
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने २३ ते २६ जानेवारी या कालावधीत बडोदा संघाविरुद्ध गोल्फ क्लब ग्राउंड (नाशिक) येथे खेळल्या जाणाऱ्या रणजी करंडक एलिट अ गट लीग सामन्यासाठी महाराष्ट्र संघाची घोषणा केली आहे. रुतुराज गायकवाड याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सचिव ॲड. कमलेश पिसाळ यांनी महाराष्ट्राचा वरिष्ठ पुरुष खेळाडूंचा संघ जाहीर केला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार, अपेक्स परिषदेचे चेअरमन सचिन मुळे, एमसीए सहसचिव संतोष बोबडे, सीईओ अजिंक्य जोशी, राजू काणे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र संघ
रुतुराज गायकवाड (कर्णधार), सिद्धेश वीर, पवन शहा, यश क्षीरसागर, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ नवले, रामकृष्ण घोष, हितेश वाळुंज, प्रशांत सोळंकी, रजनीश गुरबानी, प्रदीप दधे, मुकेश चौधरी, मुर्तुझा ट्रंकवाला, सत्यजीत बच्छाव, धनराज शिंदे, सनी पंडित.