
रिया थत्तेला २५ मीटर स्पोर्ट्स पिस्टल प्रकारात कांस्यपदक
छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाने एक रौप्य व सांघिक कांस्य अशी दोन पदके जिंकली.

पंजाब विद्यापीठ (चंदीगड) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रिया थत्ते हिने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्टल या प्रकारात कास्य पदक मिळवले. कृष्णाली राजपूत, तेजस्विनी कदम, रिया थत्ते यांनी सांघिक २५ मीटर स्पोर्ट्स पिस्टल रौप्य पदक पटकावले. तसेच या सर्व खेळाडूंची निवड खेलो इंडिया या स्पर्धेकरिता झाली आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून डॉ आस्मा परवीन सय्यद तर संघ व्यवस्थापक म्हणून अभिजितसिंह दीख्खत यांचे मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशाबद्दल कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, विद्यापीठाचे प्रशिक्षक मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीतसिंग दिक्कत, गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वहीलवार आदींनी विजयी खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले.