
जळगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेला जिल्हा क्रीडा संकुल येथे बुधावारी उत्साहात सुरुवात झाली.

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल एस तायडे, भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ प्रदीप तळवलकर, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष कैलास करवंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, नाशिक विभागीय क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, महाराष्ट्र सेपक टकारो असोसिएशनचे सहसचिव प्रा इकबाल मिर्झा, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांची उपस्थिती होती.
विजय शिंदे यांनी स्पर्धेचे अतिशय सुंदररित्या आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. राजेश जाधव, एल एस तायडे, प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी डॉ सुरेश थुरकुडे यांनी केले.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू उमाकांत जाधव (जळगाव), विराज कावडिया (जळगाव), संतोष कोळी (पुणे), नरेश राऊत (ठाणे) तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक नौशाद शेख (सातारा) आणि शरद बढे (धाराशिव) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर, छ्त्रपती संभाजीनगर व अमरावती विभागाचे मुले-मुली संघ सहभागी झाले आहेत. संघाची निवास, भोजन व मैदान व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.