छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टला देशात पहिले पारितोषिक

  • By admin
  • January 22, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी परिसरातील छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी आयसीडीसी आयटी यांनी आयोजित केलेल्या पीआयसी या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकाविले. दरवर्षी ही स्पर्धा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते.

ही स्पर्धा आयसीडीसीआयटी आणि केआयआयटी यांच्या संयुक्त विद्यमानाने भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्देश विद्यार्थ्यांना संशोधनासाठी संधी मिळावी हा आहे. त्याकरिता प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात येते. त्यातील प्रथम टप्प्यात आयडिया सबमिशन व कॅमेरा रेडी पेपरचा होता. त्यातुन एकूण १२० टीमने सहभाग घेतला होता. प्रथम टप्प्यात उत्तीर्ण होऊन ३४ टीमने अंतिम टप्प्यात प्रवेश केला. सदरील अंतिम टप्प्यात छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेत विविध प्रोजेक्ट (डोमेन) सादरीकरण करण्यात आले होते. ज्यामध्ये आरोग्य, कृषी, सॉफ्टवेअर इत्यादी प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले होते.

त्यात छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कमी खर्चात उत्कृष्ट असे दर्जाचे टोमॅटो लागवङणी यंत्र विकसित करून सामान्य शेतकऱ्यांसाठी हे उपकरण उपलब्ध करून दिले आहे. सदरील यंत्रामध्ये एआय मधील ‘योलो’ हे तंत्रज्ञान वापरून त्यामधील आजाराचा शोध घेता येतो. हे यंत्र कमीतकमी मनुष्यबळ आणि कमी वेळेमध्ये अधिक टोमॅटो रोप लावू शकते. या यंत्रणेमुळे दोन रोपांमधील अंतर कमी होते. त्यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. रोप ठेवण्यासाठी असलेल्या ट्रेमधून स्वयंचलित पद्धतीने रोप उचलून जमिनीत लावले जाते.

या स्पर्धेत महाविद्यालयातील सुरज भारत चोरमले आणि ओमकार गोविंद शिंदे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या प्रोजेक्टसाठी प्रा सचिन लहाने, प्रा युवराज नरवाडे, रवींद्र घाटे, डॉ राजेंद्र शिंदे यांचे सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ गणेश डोंगरे, मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य डॉ देवेंद्र भुयार यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *