
छत्रपती संभाजीनगर ः भारतीय खेल प्राधिकरण नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पतियाळा, साई सौदरण सेंटर, बंगलोर, कर्नाटक येथे मे आणि जून २०२४ दरम्यान घेण्यात आलेल्या एनआयएस (सिक्स विक सर्टिफिकेट कोर्स परीक्षा) बास्केटबॉल प्रशिक्षक पात्र परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू विपूल कड अव्वल श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.
विपूल कड याने महा राज्य बास्केटबॉल संघटनेचा राज्य बास्केटबॉल पंच परीक्षेत देखील अव्वल स्थान मिळवले होते. विपूल कडच्या घवघवीत यशाबद्दल मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे सचिव हेमंत पातूरकर, प्राचार्य डॉ मकरंद जोशी, विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप, महा बास्केटबॉल संघटनेचे सहसचिव व जिल्हा बास्केटबॉल संघटना अध्यक्ष गणेश कड, सचिन त्ततापुरे, प्रशांत बुरांडे, अनिस साहुजी, विश्वास कड, मंदा कड, सय्यद रफिक, रेणुका कड, मोहन वहिलवर, धवल परिहार आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.