< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); पृथ्वीराज मोहोळ महाबली चषकाचा मानकरी – Sport Splus

पृथ्वीराज मोहोळ महाबली चषकाचा मानकरी

  • By admin
  • January 23, 2025
  • 0
  • 42 Views
Spread the love

महाराष्ट्र केसरीसाठी पुणे जिल्हा संघ जाहीर

पुणे : अहिल्यानगर येथे होणाऱ्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची पुणे जिल्हा निवड चाचणी कोंढवा बुद्रुक मधील कामठे मळा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा महाबली चषकाचा मानकरी ठरला. त्याच्यासह अभिजीत भोईर, भालचंद्र कुंभार, अमोल वालगुडे, आणि आंतरराष्ट्रीय कुमार गटात रौप्य पदक जिंकणारा प्रतीक देशमुख यांची निवड पुणे जिल्हा संघात झाली आहे.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, उपाध्यक्ष विलास कथुरे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड, आयोजक बाळासाहेब धांडेकर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच मारुती सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पाडली.

मेघराज कटके म्हणाले की, ‘या निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्यात असणाऱ्या ४५०हून अधिक कुस्तीगीरांमध्ये लढत झाली. विजेत्या खेळाडूंना पदक, चषक देऊन गौरविण्यात आले.

अंतिम निकाल

बालगट : २५ किलो : १. प्रेमराज चौगुले (इंदापूर), २. विश्वमराज जाधव (भोर). २८ किलो : १. तुषार साळुंखे (वेल्हा), २. यशराज वायसे (इंदापूर). ३२ किलो : १. राजवर्धन खाडे (इंदापूर), २. ओम पवार (मावळ). ३६ किलो : १. यशराज कोल्हटकर (दौंड), २. स्वराज बोडके (मावळ). ४० किलो : १. पृथ्वीराज डोंगरे (खेड), २. ओम घोडके (इंदापूर). ४४ किलो : १. रुद्रप्रताप साबळे (खेड), २. राज गायकवाड (इंदापूर). ४८ किलो : १. साई चांदेकर (मावळ), २. वेदांत मानकर (हवेली). ५१ किलो : १. धीरज शिंदे (मावळ), २. प्रज्वल डोंगरे (खेड). ५५ किलो : १. गणेश मिडगुले (दौंड), २. सोहम थोरात (इंदापूर). ६० किलो : १. स्वराज खांडेभराड (खेड), २. यशराज चोरमले (इंदापूर).

माती विभाग

वरिष्ठ गट : ५७ किलो : १. ओमकार निगडे (भोर), २. अमित कुलाल (शिरूर). ६१ किलो : १. अमोल वालगुडे (वेल्हा), २. प्रवीण हरणावळ (इंदापूर). ६५ किलो : १. अभिजीत शेडगे (वेल्हा), २. कृष्णा हरणावळ (इंदापूर). ७० किलो : १. हर्षल फडतरे (इंदापूर), २. अभिषेक जाधव (मुळशी). ७४ किलो : १. हर्षद घोलप (खेड), २. सागर वाघमोडे (इंदापूर). ७९ किलो : १. विनायक शेंडगे (दौंड), २. संतोष पडळकर (बारामती). ८६ किलो : १. अविनाश गावडे (बारामती), २. शुभम शेटे (भोर). ९२ किलो : १. अंगद बुलबुले (बारामती), २. ऋषिकेश काळेल (इंदापूर). ९७ किलो : १. सागर देवकाते (इंदापूर), २. यश वासवंड (हवेली). १२५ किलो : १. अनिकेत मांगडे (हवेली), २. आकाश रानवडे (मुळशी).

गादी विभाग

वरिष्ठ गट : ५७ किलो : १. मिलिंद हरणावळ (इंदापूर), २. सतीश मालपोटे (मावळ). ६१ किलो : १. अभिषेक लिम्हण (वेल्हा), २. यश बुदगुडे (भोर). ६५ किलो : १. भालचंद्र कुंभार (हवेली), २. प्रथमेश कोळपे (बारामती). ७० किलो : १. विपुल थोरात (इंदापूर), २. निखिल वाडकर (खेड). ७४ किलो : १. साईराज नलावडे (जुन्नर), २. चैतन्य साबळे (खेड). ७९ किलो : १. रितेश मुळीक (पुरंदर), २. केतन घारे (मावळ). ८६ किलो : १. वैभव तांगडे (मुळशी), २. कुलदीप इंगळे (शिरूर). ९२ किलो : १. अभिजीत भोईर (मुळशी), २. आदित्य पवार (शिरूर). ९७ किलो : १. ओंकार येलभर (शिरूर), २. विजयसिंह चोरमले (इंदापूर). महाराष्ट्र केसरी : १. पृथ्वीराज मोहोळ (मुळशी), २. प्रतिक देशमुख (मावळ).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *