बीसीसीआयची कडक भूमिका, अंकित बावणेवर एका सामन्याची बंदी 

  • By admin
  • January 23, 2025
  • 0
  • 131 Views
Spread the love

मुंबई : गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी सामन्यात मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरुद्ध असहमती दर्शविल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महाराष्ट्राचा अनुभवी फलंदाज अंकित बावणे याला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्यामुळे अंकित बडोदा संघाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात खेळू शकला नाही. 

नाशिकमध्ये बडोदा विरुद्ध महाराष्ट्र हा सामना होत आहे. या ठिकाणी बीसीसीआयने महाराष्ट्र संघाला या निर्णयाची माहिती दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एमसीए मैदानावर ही घटना घडली होती. या ठिकाणी अंकित बावणे स्लिपमध्ये झेलबाद झाला. सर्व्हिसेसच्या शुभम रोहिलाने अमित शुक्लाच्या चेंडूवर झेल घेतला. या निर्णयावर अंकित याने असहमती दर्शवत क्रिझमध्ये उभा राहिला. डीआरएस उपलब्ध नसल्याने निर्णयाला आव्हान देता येत नसल्याने बावणेने सुमारे १५ मिनिटे मैदान सोडण्यास नकार दिला. सामनाधिकारी अमित शर्मा आणि महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्या हस्तक्षेपानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

एका सामन्याची बंदी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अधिकृतपणे सांगितले की रणजी ट्रॉफी खेळाडू अंकित बावणे याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका सामन्यासाठी बंदी घातली आहे. यामुळे बडोद्याविरुद्ध सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात अंकित बावणे निवडीसाठी उपलब्ध नाही.’  अंकित पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल आणि महाराष्ट्र संघाच्या यशात योगदान देत राहील असे एमसीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

बीसीसीआयच्या निर्णयांचा आदर करा
महाराष्ट्र क्रिकटे संघटनेने म्हटले आहे की, ‘आम्ही बीसीसीआयच्या निर्णयांचा आदर करतो आणि क्रिकेटच्या खेळात शिस्त आणि खिलाडूवृत्तीची तत्त्वे राखण्यासाठी वचनबद्ध आहोत.’

आगामी सामन्यात अंकितच्या सहभागाची आम्हाला उत्सुकता आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या भारत अ संघाच्या दौऱ्यावर असलेला महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अंकित बाद झाल्याचे फोटो पोस्ट केले होते आणि त्यात बावणे बाद नसल्याचे आणि निर्णय चुकीचा असल्याचे दिसून आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *