
श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर : करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू व संघांसाठी १४ वर्षांखालील दोन दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उदघाट्न माजी खासदार आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. शाहूपुरी जिमखाना या मैदानावर उद्घाटन कार्यक्रम झाला. या प्रसंगी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजीत भोसले, सचिव शितल भोसले, खजिनदार विजय सोमानी, जॉईंट सेक्रेटरी मदन शेळके, स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष कृष्णा धोत्रे, केडीसीएचे संचालक नितीन पाटील, संजय पाठारे, किरण रावण, ज्योती काटकर, नितीन पाटील, रहीम खान, करवीर तालुकाचे अध्यक्ष जनार्दन यादव, संजय पाटील, विजय यादव, शाहूपुरी जिमखानाचे दिवाकर पाटील, प्रशिक्षक युवराज पाटील, सुरज जाधव पंच महेश माने, खेळाडू व पालक उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ निमंत्रित करण्यात आले असून संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघास लीगमध्ये तीन सामने खेळावयास मिळणार आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा स्तरावर दोन दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेचे कोल्हापूर येथे करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एमसीएच्या निमंत्रित स्पर्धेच्या धर्तीवर खेळवण्यात येत आहे, असे करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन यादव यांनी सांगितले.