
मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या सहयोगाने ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत काजल कुमारी आणि महम्मद घुफ्रान यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.
लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा (पश्चिम) मुंबई येथे ही स्पर्धा होत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑईल व ओएनजी सीने पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेच्या आंतर संस्था गटात १२ संघ तर आंतर क्लब गटात ८ संघ सहभागी झाले आहेत. पुरुष एकेरी गटात १२८ खेळाडू, महिला एकेरी गटात ३२ खेळाडू तर वयस्कर पुरुष एकेरी गटात ५२ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
सांघिक गटाने स्पर्धेला सुरुवात झाली. पुरुष एकेरी गटात इंडियन ऑईलचा महम्मद घुफ्रान, महिला एकेरी गटात इंडियन ऑईलची काजल कुमारी तर पुरुष वयस्कर एकेरी गटात मुंबई महानगरपालिकेच्या शांतीलाल जितियाला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना १ लाख ५० हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेतील मानांकन
पुरुष एकेरी : १) महम्मद घुफ्रान (इंडियन ऑइल), २) संदीप देवरुखकर (ओएनजीसी), ३) ओमकार टिळक (ए के फॉउंडेशन), ४) विकास धारिया (मुंबई महानगरपालिका), ५) ओमकार नेटके (महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ), ६) प्रशांत मोरे (रिझर्व बँक), ७) अब्दुल सत्तार इस्माईल नाईक (माझगाव डॉक), ८) सिद्धांत वाडवलकर (डी के सी सी).
महिला एकेरी : १) काजल कुमारी (इंडियन ऑइल), २) अंबिका हरिथ (रिझर्व्ह बँक), ३) ऐशा साजिद खान (जैन इरिगेशन), ४) उर्मिला शेंडगे (रिझर्व बँक), ५) मिताली पाठक (जैन इरिगेशन), ६) रिंकी कुमारी (पोस्ट ऑफिस), ७) नीलम घोडके (पोस्ट ऑफिस), ८) वैभवी शेवाळे (डी के सी सी).
५० वर्षांवरील एकेरी गट : १) शांतीलाल जितिया (मुंबई महानगरपालिका), २) संदेश अडसूळ (विजय कॅरम क्लब), ३) नूर महम्मद शेख (ए के फाऊंडेशन), ४) बाबुलाल श्रीमल (फ्रेंड्स कॅरम क्लब).