
सातारा : सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा पुरस्कारांचे वितरण रविवारी करण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा क्रीडा पुरस्कार यंदा कविता उत्तम महांगडे (तलवारबाजी), यासर अशिफ मुलानी (बॉक्सिंग), सृष्टी ज्ञानेश्वर जाधव (तलवारबाजी), विक्रम जिजाबा शेंडगे (अॅथलेटिक्स) यांना जाहीर करण्यात आला आहे, असे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी सांगितले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रविवारी जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या सोहळ्यात क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी सांगितले.