
अंतिम सामन्यात अव्वल मानांकित सबालेंकाला नमवले
मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत १९ व्या मानांकित मॅडिसन कीजने विजेतेपदाच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आर्यना सबालेंकाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
एका रोमांचक अंतिम सामन्यात मॅडिसन कीजने सबालेंकाचा ६-३, २-६, ७-५ असा पराभव केला. मॅडिसनने या विजयासह सबालेंकाची सलग तिसऱ्या विजेतेपदाकडे वाटचाल थांबवली. कीजचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
सबालेन्का हिने हे विजेतेपद जिंकले असते, तर ती ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणारी सहावी महिला ठरली असती. १९९७-१९९९ पासून मेलबर्न पार्क येथे तीन वेळा विजेतेपद जिंकणारी मार्टिना हिंगिसनंतर तिला पहिली महिला खेळाडू बनण्याची संधी मिळाली. तथापि, उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इगा स्वाएटेक हिला पराभूत करणाऱ्या कीजने सबालेंकाला हरवून तिचे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.