
छत्रपती संभाजीनगर : प्रजासत्ताक दिनानिमित्त विस्डम इंग्लिश स्कूलतर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शाळेतील विविध विद्यार्थ्यानी वेषभूषा करून समाजात समता, सखोलता, एकात्मतेचा संदेश देत देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांची मने जिंकली.

विस्डम इंग्लिश स्कूल शाळेपासून रॅलीला सुरूवात करण्यात आली , पुढे अयोध्यानगर, मोहटा देवी मंदिर लोकमान चौक, जागृत हनुमान मंदिर, बजाजनगर या परिसरात रॅली काढून देशभक्तीपर घोषणांनी विद्यार्थिनी बजाजनगर परिसर दणाणून सोडला. जागृत हनुमान मंदिर चौक या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.
पर्यावरण संरक्षण, निरोगी आरोग्य, स्वच्छता अभियान जनजागृती आदींबाबतलोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, डायरेक्टर अजगर बेग व ईश्रत बेग यांच्या मार्गदर्शनाखाली या समाज प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅली यशस्वीतेसाठी शाळेच्या चेतना पटेल, पूनम पाटील, अश्विनी उगले, वंदना चावरे निशिगंधा तायडे, स्नेहल पटेल, ज्योती कापसे, शुभांगी बावीस्कर, कविता काटापले, आरती डहाळे, शितल खैरनार, कावेरी खेडकर, ज्योती गायके, गायत्री पवार, सारिका पवार, पूजा कावडे, मयुरी वानखेडे, बालिका कांबळे, मीनाक्षी परदेशी व शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा कैलास जाधव व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील राहील असे मत संस्थेच्या संचालिका ईश्रत बेग यांनी व्यक्त केले.