
कल्याण : कल्याण येथील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी व स्पोर्ट्स केयर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कल्याण क्रीडा महोत्सवाला शानदार सुरुवात झाली.
अविनाश कदम आणि यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ ठाणे जिल्ह्यातील पहिली दहा वर्षांखालील खेळाडूंसाठी मास्टर ट्रॉफी टी २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजनाने क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, स्केटिंग, तायक्वांदो, मल्लखांब, चेस, फुटबॉल, कराटे, योगा, कॅरम, अॅथलेटिक्स, आट्या पाट्या व लगोरी या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट व तायक्वांदो या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाने क्रीडा महोत्सवाला शानदार सुरुवात झाली.
कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त वंदना गुळवे, सहआयुक्त प्रीती गाडे, मुंबई क्रिकेट संघटनेचे सदस्य अरविंद कदम, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव संजय जाधव, काँग्रेसचे ब्रिज किशोर दत्त, ताइक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संदीप ओंबासे, अविनाश ओंबासे, सुधाकर शेट्टी, राकेश पाटील यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे संचालक संतोष पाठक व प्रशिक्षक परेश हिंदुराव विनायक राऊल आदी मान्यवर उपस्थित होते.