
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद किल्ला सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते. यंदा सायकल राइडचे दहावे वर्ष होते. छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद किल्ला सायकल राइडमध्ये १२० सायकलपटूंनी सहभाग घेतला.
सायकल बेट सेव्हन हिल येथून सायकल राइडला प्रारंभ झाला. आकाशवाणी चौक, क्रांतीचौक, महावीर स्तंभ चौक, नगर नाका, दौलताबाद टी-पॉइंट व दौलताबाद किल्ला असा सायकल राइडचा मार्ग होता. लुधियाना सायकल स्टोअरचे मालक निखिल मिसाळ व स्पेस कॉम्प्युटरचे मालकचे संजय गव्हाणे यांच्या हस्ते सायकल राइडला झेंडा दाखवण्यात आला. दौलताबाद किल्ल्यावर सर्वांनी ध्वजवंदन व राष्ट्रगान करण्यात आले.
या सायकल रॅलीमध्ये संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरणजित सिंग संघा, निखिल मिसळ, अतुल जोशी, मनीष खंडेलवाल, अमोघ जैन, राज कुमार मालाणी, डॉ दीपक कुंकुलोल, सोनम शर्मा, डॉ संगीता देशपांडे, सरबज्योत सिंग, वैभव डबीर, संतोष हिरेमठ, नुपूर धानुका, चंद्रकांत कदम, राहुल कुमार, रवींद्र जोशी, अविनाश नागरे, डॉ सुदाम बनकर, अमोल सोमवंशी, श्रद्धा कचेश्वर, अर्निका कचेश्वर, कृतिका कचेश्वर, साईनाथ मोरे, बालाजी नारगुडी, विकास पाटील, अंकुश केदार, चैत्राली गाणार, किशोर गाणार, अनिल सुलाखे, वैशाली आघाव, आकाश भारतघ्या, आरव कुंकुलोल, प्रशांत दाभोळकर, सचिन कासलीवाल, राजेश कासलीवाल, श्वेता कासलीवाल, रोनी थोले, आकाश पायनी, समिहान सुनील देशमुख, संकेत पहाडे, शिवाजी खांद्रे, आदित्य पठाडे, सोम विकास, यशोधन गाडेकर, डॉ प्रफुल जटाळे, मिलिंद खेरुडकर, सौरभ जामकर, आशिष सेठी, तनिष सेठी, प्रसाद जोशी, दत्तात्रय पोतदार, सुहास आंबेकर, वैशाली जाधव, रिचा जैन, अनय जैन, शाम पाटील, तुषार प्रधान, जनार्दन चोपडे, दत्तात्रय तोडकर, कविता जाधव, मनोज जाधव, डॉ राजेश रोडगे, मुकेश सेडामकर, आशिष अस्वार, आकाश परदेशी, रेवंश बनकर, योगेश चौधरी, मनीष गंगवाल, शुभम शिंदे, संतोष बेडके, संदीप शिंदे, राहुल डोके, अनिल अतकरे, अभिषेक पाठक, किशोर देसले, अनंत सहस्त्रबुद्धे, किशोर दिनकर, कृष्णा भद्रेवार, हर्षद अडलकोंडा, संतोष मुळ्ये, वर्षा अतकरे, चेतन मलानी आदी सायकलपटू सहभागी झाले होते.