
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
मुंबई : हल्दवणी (उत्तराखंड) येथे सुरू झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा खो-खो संघाचे नेतृत्व गजानन शेंगाळ (ठाणे) आणि संपदा मोरे (धाराशिव) हे करणार आहेत.

महाराष्ट्र खो-खो संघात निवड झालेल्या खेळाडूंनी बालेवाडी, पुणे येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात कठोर मेहनत घेतली. या प्रशिक्षण शिबिरात राजेंद्र साप्ते यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस डॉ चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले आणि खजिनदार अॅड गोविंद शर्मा यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र खो-खो संघ
पुरुष संघ : प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, शुभम थोरात, आदित्य गणपुले, राहुल मंडल (सर्व पुणे), निहार दुबळे, अनिकेत चेंदवनकर (सर्व मुंबई उपनगर), गजानन शेंगाळ (कर्णधार), आकाश कदम (सर्व ठाणे), सौरभ घाडगे (सांगली), रामजी कश्यप (सोलापूर), रोहित चव्हाण, विराज जाधव (सर्व धाराशिव), सौरभ आढावकर (कोल्हापूर), सिद्धेश सातपुते (विदर्भ). प्रशिक्षक : राजेंद्र साप्ते (पुणे), सहाय्यक प्रशिक्षक : नागनाथ गजमल (हिंगोली), व्यवस्थापक : डॉ राजेश सोनावणे (नंदुरबार)
महिला संघ : प्रियांका इंगळे, ऋतिका राठोड, श्वेता वाघ (सर्व पुणे), रेश्मा राठोड, अश्विनी मोरे, साक्षी तोरणे (सर्व ठाणे), संपदा मोरे (कर्णधार), अश्विनी शिंदे, गौरी शिंदे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे (सर्व धाराशिव), सानिका चाफे (सांगली), पायल पवार (रत्नागिरी), ऋतुजा सहारे (नाशिक), श्रेया पाटील (कोल्हापूर). प्रशिक्षक : पंकज चवंडे (रत्नागिरी), सहाय्यक प्रशिक्षक : सारिका जगताप (सातारा), व्यवस्थापिका : वर्षा जाधव (धाराशिव).