
एबी, जीजी अँड मनप्रीत जॅग्वार्स संघाला उपविजेतेपद
पुणे : पूना क्लब लिमिटेड यांच्या वतीने आयोजित पूना क्लब गोल्फ लीग स्पर्धेत संपूर्ण स्पर्धेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या हिलयॉस ईगल्स संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावताना हॅटट्रिक साधली. एबी, जीजी अँड मनप्रीत जॅग्वार्स संघाने उपविजेतेपद पटकावले.
येरवडा येथील पूना क्लब गोल्फ येथे पार पडलेल्या ड्यूकॅटी लीगसी मोटर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या इरिगेशन प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड, टोरो, कोलते पाटील डेव्हलपर्स यांचे सह प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेत हिलयॉस ईगल्स संघाने २०२०,२०२३, २०२४ अशी गेल्या सहा वर्षात चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्याची आगळीवेगळी कामगिरी कामगिरी बजावली आहे.
अंतिम फेरीत उत्कृष्ट पटींग आणि अचूक चिपिंग अशा कामगिरीच्या जोरावर गतविजेत्या हिलयॉस ईगल्स संघाने 16 गुणांसह अजिंक्यपद राखले.
विजेत्या हिलयॉस ईगल्स संघाच्या विजयात सुशांत खोसला, जियाजी भोसले, रुद्रांशवर्धन सिंग, संजीव हुकमानी, ऋषी भोसले, सलील भार्गव आणि अनिता पूनामिया यांनी मोलाचा वाटा उचलला. गुर्की शेरगील हे हिलयॉस ईगल्स संघाचे प्रशिक्षक आहेत. एबी अँड जीजी जगवर्स आणि मानव पारी पिन सिकर्स यांनी प्रत्येकी १३ गुणांसह संयुक्त दुसरा क्रमांक पटकावला.
पूना क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक म्हणाले की, ‘पूना क्लब गोल्फ लीग ही स्पर्धा दरवर्षी नवनवे मानदंड प्रस्थापित करत आली आहे. यावर्षीच्या स्पर्धेतून गुणवत्ता आणि स्पर्धात्मकतेबरोबरच सर्व खेळाडूंमधील बंधुभाव विशेष करून दिसून आला. सर्व संघानी या स्पर्धेत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल यांचे मनापासून अभिनंदन.’
उपाध्यक्ष व गोल्फ लीगचे अध्यक्ष इंद्रनील मुजगुले म्हणाले की, ‘या संपूर्ण स्पर्धेत दिसून आलेली खेळावरील निष्ठा आणि जय पराजया पलीकडे जाऊन जपलेली खिलाडूवृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायक होती. आपल्या सर्वांचा आवडता खेळ असलेल्या गोल्फसाठी आतापण सर्वजण मिळून असेच मनापासून काम करू आणि पूना क्लब गोल्फ कोर्सला भविष्यात नव्या उंचीवर घेऊन जाऊ, असे आवाहन मी सर्वांना करत आहे.’
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लबचे उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले, गोल्फ कॅप्टन जय शिर्के आणि स्पर्धा संचालक आदित्य कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वोत्कृष्ट गोल्फर म्हणून गोल्ड डिव्हीजन मधून आरकिन पाटील (जॅग्वार्स), सिल्व्हर डिव्हिजनमधून रत्नाकर कर्वे (मानव पारी पिन सिकर्स) आणि ब्रॉन्झ डिव्हिजन मधून आशुतोष लिमये(जॅग्वार्स) यांना पुरस्कार देण्यात आला.
अंतिम निकाल
१. हिलयॉस ईगल्स
२. एबी, जीजी अँड मनप्रीत जॅग्वार्स
३. मानव पारी पिन सिकर्स४. शुबान सनरायजर्स
५. जिंगर
६. एरिस्टा फेअरवे टायटन्स
७. व्हॅस्कॉन द होली वन्स
८. केके रॉयल्स