खो-खो स्पर्धेत सरस्वती स्पोर्ट्स क्लब, मध्य रेल्वे, रचना नोटरी वर्क्स संघाला विजेतेपद

  • By admin
  • January 28, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love

मुंबई : विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धेत किशोर गटात सरस्वती स्पोर्ट्स क्लब संघाने विजेतेपद पटकावले. व्यावसायिक पुरुष गटात मध्य रेल्वे आणि महिला गटात रचना नोटरी वर्क्स यांनी विजेतेपद संपादन केले.

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित किशोर गट (४ फुट ११ इंच) व व्यावसायिक पुरुष आणि महिला गटाची खो-खो स्पर्धा लाल मैदान परळ येथे आयोजित करण्यात आली होती.

व्यावसायिक पुरुष गट
व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेचा १७-१४ असा ३ गुणांनी पराभव केला. मध्य रेल्वेतर्फे दिलीप खांडवीने १:१०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. अवधूत पाटीलने १:३०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. मिलिंद चावरेकर व रोहन शिंगाडेने प्रत्येकी १:००, १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात प्रत्येकी ४ गडी बाद केले. पश्चिम रेल्वेतर्फे सम्यक जाधवने १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ५ गडी बाद केले. वृषभ वाघने २:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. दिपक माधवने २:१०, १:३० मिनिटे संरक्षण केले.

व्यावसायिक महिला गट
व्यावसायिक महिला गटाच्या अंतिम सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महावितरण कंपनी संघाचा ११-१० असा १ गुण व १:१० मिनिटे राखून पराभव केला. रचनातर्फे पुजा फरगडेने २:००, २:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. श्वेता जाधवने २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ खेळाडू बाद केले. सेजल यादवने ३:२०, १:४० मिनिटे संरक्षण केले. महावितरण तर्फे दिलेली लढत संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही.

किशोर गट
किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा ४-३ असा १ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला. सरस्वतीतर्फे मेहक आदवडेने नाबाद ६:००, नाबाद ३:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. वरुण गुप्ताने २:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. शिवम झाने १:००, १:०० मिनिटे संरक्षण केले. विद्यार्थीतर्फे अपसर शेखने ३:२० मिनिटे संरक्षण केले. पवन गुरवने १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. ओमकार जाधवने २:३० मिनिटे संरक्षण केले.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू

किशोर गट : आक्रमक – पवन गुरव (विद्यार्थी), संरक्षक – अधिराज गुरव (ओम साईश्वर), अष्टपैलू – महेक आदवडे (सरस्वती).

व्यावसायिक महिला गट : आक्रमक – काजल शेख (रचना), संरक्षण – सेजल यादव (रचना), अष्टपैलू – कल्याणी कंक (महावितरण).

व्यावसायिक पुरुष गट : आक्रमक – सम्यक जाधव (पश्चिम रेल्वे), संरक्षक – अवधूत पाटील (मध्य रेल्वे), अष्टपैलू – दिलीप खांडवी (मध्य रेल्वे).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *