
उद्योजक आनंद भाटिया यांची अध्यक्षपदी निवड
नाशिक : नाशिक जिल्ह्यात विविध खेळांमध्ये मोलाचे योगदान असलेले आणि बास्केटबॉल या खेळामध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू घडवलेले ज्येष्ठ क्रीडा संघटक सचिन साळवे यांची नाशिक व्हीलचेअर बास्केटबॉल असोसिएशनच्या सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद भाटिया यांची अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रीय खेळाडू मेघा काळेमगरे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.
सचिन साळवे यांचे बास्केटबॉल या खेळासाठी विशेष योगदान आहे. एकलहरे येथील मध्यामिक विद्यामंदिर येथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी १८९० पासून आपल्या खेळला सुरवात केली. त्यांचा अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग होता. राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात सचिन साळवे यांचा मोलाचा वाटा आहे. ते राष्ट्रीय पंच आहेत.
नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे कार्यरत असतानाच त्यांनी बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रशिक्षक म्हणून अनेक राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर खेळाडू घडवले आहेत. सचिन साळवे यांच्या या नियुक्तीबद्दल आदिवासी क्रीडा प्रोबोधिनीचे प्राचार्य तथा महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ बास्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, समाजसेविका ललिता गौतम पगारे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
एकलहरा पंचकृषीच्या माऊली मंदाकिनी रतन साळवे, नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरेचे पदाधिकारी, माध्यमिक विद्यामंदिर, एकलहरेचे सर्व सहकारी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर अशोक दुधारे, आनंद खरे आदी मान्यवरांनी सचिन साळवे यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.